अ‍ॅपशहर

मजा-मस्तीची अनोखी धून

कॉलेज फेस्टिवल म्हणजे तरुणाईच्या उत्साहाचं एक अनोखं प्रदर्शन आणि मजा-मस्तीबरोबरच स्पर्धकांच्या एकाहून एक सरस सादरीकरणांची रेलचेल. असाच जोशपूर्ण माहोल पाहायला मिळाला चर्चगेटच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये. निमित्त होतं कॉलेजच्या हिंदी साहित्य मंडळातर्फे आयोजित केल्या गेलेल्या 'धून' या फेस्टिवलचं.

Maharashtra Times 27 Sep 2016, 12:56 am
>> ज्ञानेश्वरी वेलणकर, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sydenham collage festival
मजा-मस्तीची अनोखी धून


कॉलेज फेस्टिवल म्हणजे तरुणाईच्या उत्साहाचं एक अनोखं प्रदर्शन आणि मजा-मस्तीबरोबरच स्पर्धकांच्या एकाहून एक सरस सादरीकरणांची रेलचेल. असाच जोशपूर्ण माहोल पाहायला मिळाला चर्चगेटच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये. निमित्त होतं कॉलेजच्या हिंदी साहित्य मंडळातर्फे आयोजित केल्या गेलेल्या 'धून' या फेस्टिवलचं. 'महाराष्ट्र टाईम्स' या फेस्टिवलचा मीडिया पार्टनर होता.

लिटररी आर्टस्, फाईन आर्टस् आणि परफॉर्मिंग आर्टस् अशा तीन विभागांमध्ये अनेक धम्माल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. कथा लेखन आणि निबंध लेखन यांसारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा भाषेवरील प्रभूत्त्वाचा आणि सर्जनशीलतेचा कस लागला. तर वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत स्पर्धकांनी एकमेकांना सडे तोड उत्तरं दिली. फाईन आर्टस् विभागांतर्गत पोस्टर मेकिंग, चारकोल पेंटिंग, मॉडेल मेकिंग आणि पॉट पेंटिंग अशा भन्नाट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात रंगांशी खेळण्याबरोबरच सामाजिक संदेश देणारी चित्र देखील विद्यार्थ्यांनी रेखाटली.

नृत्य आणि संगीत या विभागांतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांनाही तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला. फॅशन शो हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. खास विद्यार्थ्यांसाठी यावेळी 'गरबा नाईट' आणि 'बॉलिवूड unplugged' या खास इव्हेंट्सचा समावेश होता. याबाबद्दल बोलताना आयोजक चमूतील तासमिया म्हणाली की, " फेस्टिवलमुळे कॉलेजमधील आमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना प्रकाशझोतात आणायला आम्हाला मदत झाली. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व्यासपीठ तर मिळालंच पण इथून पुढे इतर कॉलेजांच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा करण्याचा आत्मविश्वासदेखील बळावला आहे हे विशेष’.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज