अ‍ॅपशहर

'कॉर्टोकिनो'चा फिल्मी अंदाज

अंधेरीच्या ठाकूर कॉलेजमध्ये नुकताच 'कॉर्टोकिनो' हा फिल्म फेस्टिव्हल मोठ्या दणक्यात पार पडला. 'अनलिशिंग ग्लोबल सिनेमा' असं ब्रीदवाक्य असणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातून सुमारे ६०० एन्ट्री आल्या होत्या. कॉलेजच्या बी.एम.एम विभागातर्फे आयोजित केल्या गेलेल्या या महोत्सवाचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर होता.

Maharashtra Times 24 Jan 2017, 12:58 am
>> ज्ञानेश्वरी वेलणकर, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thakur college festival
'कॉर्टोकिनो'चा फिल्मी अंदाज

अंधेरीच्या ठाकूर कॉलेजमध्ये नुकताच 'कॉर्टोकिनो' हा फिल्म फेस्टिव्हल मोठ्या दणक्यात पार पडला. 'अनलिशिंग ग्लोबल सिनेमा' असं ब्रीदवाक्य असणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातून सुमारे ६०० एन्ट्री आल्या होत्या. कॉलेजच्या बी.एम.एम विभागातर्फे आयोजित केल्या गेलेल्या या महोत्सवाचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर होता.

शॉर्टफिल्म, ऍड फिल्म, पोस्टरबाजी आणि सिनेमाचं पार्श्वगायन यावर आधारित विविध स्पर्धा रंगल्या. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या दिग्ग्ज मंडळींबरोबर विद्यार्थ्यांनी थेट संवाद देखील साधला. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी भन्नाट इव्हेंट्सची रेलचेल उपस्थितांना अनुभवायला मिळाली. सामाजिक विषयांना हात घालणारी 'शूट फॉर चेंज' ही स्पर्धा रंगली. 'युअर बॉक्स ऑफ सिनेमा' या स्पर्धेत विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या जॉनरचं संमिश्रण करून एक चित्रपट बनवायचा होता. फेस्टिव्हलमधला सर्वात लक्षवेधी इव्हेंट होता तो म्हणजे 'ट्रेल अ फ्रेम'. या इव्हेंट अंतर्गत स्पर्धकांना एका प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा ट्रेलर पुन्हा बनवायचा होता. स्पर्धकांनी आपल्या सर्जनशीलतेला आजमावत एकाहून एक सरस अशा ट्रेलर्सचं प्रदर्शन यावेळी केलं. महोत्सवाची सांगता 'ड्रीम वॉक' या फॅशन शो इव्हेंटने करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज