अ‍ॅपशहर

रंगला ‘त्सुनामी’

एकापेक्षा एक भन्नाट स्पर्धा, त्यात रंगलेली चुरस आणि वेगवेगळ्या खेळांची गंमत हे चित्र पाहायला मिळालं लाला लजपतराय कॉलेजमध्ये नुकत्याच रंगलेल्या ‘त्सुनामी’ फेस्टिवलमध्ये.

Maharashtra Times 25 Aug 2016, 2:50 am
अस्मिता कदम,कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tsunami festival
रंगला ‘त्सुनामी’


एकापेक्षा एक भन्नाट स्पर्धा, त्यात रंगलेली चुरस आणि वेगवेगळ्या खेळांची गंमत हे चित्र पाहायला मिळालं लाला लजपतराय कॉलेजमध्ये नुकत्याच रंगलेल्या ‘त्सुनामी’ फेस्टिवलमध्ये.

एकापेक्षा एक भन्नाट स्पर्धा, त्यात रंगलेली चुरस आणि वेगवेगळ्या खेळांची गंमत हे चित्र पाहायला मिळालं लाला लजपतराय कॉलेजमध्ये नुकत्याच रंगलेल्या ‘त्सुनामी’ फेस्टिवलमध्ये. कॉलेजच्या बीएमएस विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टमध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी बघायला मिळाल्या. या फेस्टमध्ये मुंबईतली २० हून अधिक कॉलेजेस सहभाग झाली होती. मुंबईतला सगळ्यात मोठा इंटरकॉलेज बीएमएस फेस्ट अशी या फेस्टची ओळख आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या फेस्टिवलचा मीडिया पार्टनर आहे.

फेस्टच्या दुसऱ्या दिवशी 'यूथ पार्लमेंट' (युवा संसद) भरवण्यात आली होती. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोन संघांत त्याची विभागणी करण्यात आली. देशापुढील प्रश्न, वेगवेगळ्या समस्या याबाबत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी माहिती द्यायची, प्रश्न विचारायचे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यावर सत्ताधाऱ्यांना प्रतिप्रश्न करत त्यांना कोंडीत पकडायचं असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. रेल्वेचे होणारे अपघात, वाढत्या गर्दीचं नियोजन, जम्मू आणि काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांच्या समस्या इथपासून ते भारताला न मिळालेलं एनएसजीचं सदस्यत्व, रुपयामध्ये होणारी घसरण अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा रंगली. या चर्चेबरोबरच त्यावर काय उपाय करता येऊ शकतील हेदेखील सुचवण्यात आलं. सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांतल्या त्रुटी सांगितल्या गेल्या. या स्पर्धेसाठी मुंबई युनिव्हर्सिटी नियामक मंडळाचे सदस्य आणि आयएएस फोरमचे संस्थापक विजय कदम उपस्थित होते.

स्पर्धांमध्ये दे धक्का
'ट्रेजर हंट'चं आयोजन यावर्षी एस्सेल वर्ल्डमध्ये करण्यात आलं होतं. सरप्राइज इव्हेंट्सदेखील आयोजित करण्यात आले होते. याचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकांनाही या स्पर्धा म्हणजे आश्चर्याचा धक्का होत्या. 'डर्टी स्टेप्स', 'कलर मी बॅड', 'वॉच मी फॉल', 'मेक मी अप' अशा अनेक गमतीदार खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं.
'स्पोर्टस डे'च्या दिवशी फुटबॉल, रस्सीखेच, १००-५०० मीटर धावण्याची शर्यत अशा खेळांसोबत 'स्क्वीडिच' या खेळासाठी थोडे हटके नियम बनवून त्यात अनोखेपणा आणण्यात आला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज