अ‍ॅपशहर

लीप वर्ष म्हणजे काय?

दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जाता. यामुळं फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्षाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Feb 2020, 10:00 am
दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जाता. यामुळं फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्षाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम leap year


लीप वर्ष म्हणजे काय?

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तर सर्वांनाच ठावूक आहे. पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. पण खरंतर, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५.२४२ दिवसांचा काळ लागतो. ०.२४२ या वेळ आपण धरत नाही. दर ४ वर्षांनी या वेळेचे मिळून २४ तास होतात. म्हणजे एक पूर्ण दिवस. हा एक दिवस वाढल्याने फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्ष सोडले तर इतर वर्षी फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा होतो.

लीप वर्ष कसं सुरू झालं

ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात ते लीप वर्ष आहे असं मानण्यात येतं

लीप वर्षाची सुरुवात कधी झाली

येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतर चार वर्षांनी पहिलं लीप वर्ष होतं. त्यानंतर दर चार महिन्यांनी लीप वर्ष येतं.

लीप वर्ष कसं ओळखावं

ज्या वर्षाला ४ने भाग जातो त्याला लीप वर्ष असं म्हणतात. उदा, २०२० या आकड्यातील २० ला ४नं भाग जातो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज