अ‍ॅपशहर

चुकुनही गर्लफ्रेंडला या ५ गोष्टी सांगू नका, नाहीतर ब्रेकअप झालंच म्हणून समजा

रिलेशनशिपमध्ये आल्यावर आपण वेगळ्याच दुनियेत जगत असतो. आपल्या जोडीदाराच्या सर्वच गोष्टी आपण मनापासून ऐकत असतो. पण कधी कधी आपल्या आयुष्याती काही गोष्टी आपल्या पार्टनरला न सांगणच हिताच ठरतं. जर तुम्ही असे केले तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. चला तर ंमग जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी.

Authored byमृणाल पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2022, 2:39 pm
प्रत्येक नात्याला वेळ देणं महत्त्वाचं असतं. नात्याची काळजी घेतल्यामुळे ते नातं टिकून राहतं. प्रेमात पडल्यावर आपल्याला प्रत्येक गोष्ट सुंदर वाटत असतात. प्रेमाच्या ओघात आपण आपल्या पार्टनरला काही गोष्टी सांगतो. पण यागोष्टी आपल्या नात्यासाठी घातक ठरु शकतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 things should never tell your girlfriend in relationship
चुकुनही गर्लफ्रेंडला या ५ गोष्टी सांगू नका, नाहीतर ब्रेकअप झालंच म्हणून समजा


महिलांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची खूप उत्सूक असते. पण याच उत्सूकते पोटी तुम्ही त्या गोष्टी सांगितल्या तर यामध्ये तुमचेच नुकसान आहे. जर तुम्हाला तुमचे नाते टिकवून ठेवायचे असेल तर तुमच्या पार्टनरपासून तुम्हाला काही गोष्टी लपवणं गरजेच असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )

भूतकाळाच्या आठवणी

तुमचे यापूर्वी अफेअर असेल तर लगेल तुमच्या गर्लफ्रेंडला सांगू नका. मुली या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. पण जर त्यांना ही गोष्ट तुम्ही सांगितली तर त्यांना असुरक्षित वाटते. या गोष्टीवरुन तुमच्या बाबतीत तुमच्या गर्लफ्रेंडच्या मनात शंका निर्माण होऊ शकते.

(वाचा :- एका मिनिटात दूर होईल केसांतील दुर्गंधी किंवा घाण वास येण्याची समस्या, फक्त ट्राय करा ‘हे’ 5 घरगुती उपाय..!)

रागावली आहे का ? असं विचारणं

महिलांना कोणत्या गोष्टीवर राग येईल हे आपण सांगू शकत नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की त्या रागावल्या आहेत तर त्यांना तु रागावली आहे का ? असा प्रश्न विचारण्याची चुक करु नका. या गोष्टीमुळे महिालांना जास्त राग येतो. जर ती रागावली असेल तर तीला शांत करण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- एका मिनिटात दूर होईल केसांतील दुर्गंधी किंवा घाण वास येण्याची समस्या, फक्त ट्राय करा ‘हे’ 5 घरगुती उपाय..!)

वाद घालू नका

तुमच्या गर्लफ्रेंडसोबत तुमचे भांडण झालं असेल तर त्याच्याशी वाद घालू नका. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. आधीच रागात असणाऱ्या तुमच्या गर्लफ्रेंडला तुमच्या प्रश्नांमुळे अजूनच त्रास होऊ शकतो. आणि जर असे झाले तर तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

(वाचा :- Beat The Heat : उन्हाळ्यात 'या' ५ ड्रिंक्सने मिळवा ग्लोइंग त्वचा, रेसिपी देखील अतिशय सोपी)

गर्लफ्रेंडला कपड्यांसंबंधी सल्ला देऊ नका

तुमच्या गर्लफ्रेंडला कपड्यांविषयी सल्ले देऊ नका. ही गोष्ट त्यांना अजिबात आवडत नाही. जर तुम्ही चुकून असे केलेत तर तुम्ही त्यांना नियंत्रणात ठेवताय असंच त्यांना वाटू लागेल. त्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडसोबत ही गोष्ट न केलेलीच चांगली.

(वाचा :- करीना कपूरपासून आलियापर्यंत जाणून घ्या सर्व अभिनेत्रींचे ब्युटी सिक्रेटस, मिळवा ग्लोइंग स्किन..!)

गर्लफ्रेंडच्या मित्रांबद्दल वाईट बोलू नका

जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला तिच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलत असाल तर तुमचे नाते धोक्यात आहे. तुमचे नाते अजून घट्ट करण्यासाठी तुमच्या गर्लफ्रेंडच्या मित्रांशी चांगले संबंध निर्माण करा.

(वाचा :- Lipstick Tips : लिपस्टिक लावल्यामुळे तुमचे ओठ फाटतात? 5 टिप्स ठेवतील अतिशय मुलायम)

लेखकाबद्दल
मृणाल पाटील
"मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. "... आणखी वाचा

महत्वाचे लेख