अ‍ॅपशहर

चिल्लरपार्टीसाठी मनोरंजनाचा खजिना

हल्ली कार्टूनमध्ये रमणाऱ्या लहान मुलांसाठी मनोरंजनाचा आणखीनही खूप मोठा खजिना उपलब्ध आहे. बालदिनानिमित्त अभिनेता-लेखक-दिग्दर्शक संदेश कुलकर्णीनं 'बघायला आणि वाचायला हवंच' अशा काही पुस्तकं आणि सिनेमांची नावं सुचवली आहेत, ती अशी...

Maharashtra Times 14 Nov 2017, 4:32 am
हल्ली कार्टूनमध्ये रमणाऱ्या लहान मुलांसाठी मनोरंजनाचा आणखीनही खूप मोठा खजिना उपलब्ध आहे. बालदिनानिमित्त अभिनेता-लेखक-दिग्दर्शक संदेश कुलकर्णीनं 'बघायला आणि वाचायला हवंच' अशा काही पुस्तकं आणि सिनेमांची नावं सुचवली आहेत, ती अशी...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम childrens must read
चिल्लरपार्टीसाठी मनोरंजनाचा खजिना


पुस्तकं

- बालसाहित्य म्हंटल्यावर माधुरी पुरंदरे यांची सगळीच पुस्तकं वाचणं मस्ट म्हणता येईल. यात 'कंटाळा', 'जादूगार आणि इतर कथा', 'हात मोडला', 'मामाच्या गावाला', 'परी मी आणि हिप्पोपोटामस', 'राधाचं घर', 'सुपरबाबा' अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

- अमेरिकन लेखक जेफ कीने यांची 'डायरी ऑफ अ विम्पी किड' नावाची सीरिज सगळ्या बच्चेकंपनीनं वाचण्याजोगी आहे.

- रोअल्ड डाल लिखित 'जेम्स अँड द जायंट पीच', 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी', 'मटिल्डा', 'फँटास्टिक मिस्टर फॉक्स' अशी अनेक पुस्तकं वाचताना मुलांना मजा येईल.

सिनेमा

- आजही चार्ली चॅप्लिनचं तितकंच आकर्षण प्रत्येक वयोगटात आढळतं. त्यांचे 'द किड', 'मॉडर्न टाइम्स', 'गोल्ड रश', 'किड ऑटो रेसेस ऍट व्हेनिस' आदी सिनेमे म्हणजे मस्ट वॉच!

- ड्रीमवर्क्स अॅनिमेशनच्या 'द कुंग फू पांडा' फ्रांचायझीमधले तीनही सिनेमे फार सुंदर आहेत. यातील 'पो', 'टायग्रेस', 'मास्टर शिफु' अशा प्रत्येक पात्राकडून मुलांना काही तरी नवीन शिकायला मिळतं.

- सत्यजित रे यांचे 'सोनार केला', 'जॉई बाबा फेलुनाथ', 'पारस पतथर', 'हिरक राजर देशे', 'गोपी गायन बाघा बायन' हे बालसिनेमे सगळ्या वयोगटाला आवडतील असे आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज