अ‍ॅपशहर

पुस्तकांच्या ‘कंपनी’त

वाचन हा आपल्यापैकी अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. पण एकदा नोकरीचा व्याप सुरू झाला की वाचनासाठी मिळणारा वेळ कमी-कमी होत जातो. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना वाचनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कंपन्यांनी लायब्ररींशी ‘टायअप’ केले असून, कर्मचाऱ्यांना ऑफिसबसल्या पुस्तकं मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे.

Maharashtra Times 11 Jul 2016, 2:31 am
शब्दुली कुलकर्णी, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corporate companies scheme for employees
पुस्तकांच्या ‘कंपनी’त


वाचन हा आपल्यापैकी अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. पण एकदा नोकरीचा व्याप सुरू झाला की वाचनासाठी मिळणारा वेळ कमी-कमी होत जातो. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना वाचनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कंपन्यांनी लायब्ररींशी ‘टायअप’ केले असून, कर्मचाऱ्यांना ऑफिसबसल्या पुस्तकं मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे.

ऑफिसचं भरपूर काम, टार्गेट पूर्ण करण्याचं टेन्शन यामुळे वाचनासाठी वेळ मिळत नाही असं अनेक कर्मचाऱ्यांचं म्हणणं असतं. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. कर्मचाऱ्यांसाठी विविध अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधांमध्ये भर पडली आहे ती लायब्ररीची सेवा पुरवण्याची. अनेक कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना बसल्या जागी लायब्ररीची सेवा पुरवत आहेत. ऑफिसच्या नजीक असलेली किंवा काही नामांकित लायब्ररींशी कंपन्या करार करतात.

लायब्ररींमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी कर्मचाऱ्यांना इमेल केली जाते. कर्मचारी आपल्या आवडीनुसार यादीतली पुस्तकांची निवड करतो. कर्मचाऱ्यांनी निवडलेलं पुस्तक त्यांच्या अगदी डेस्कपाशी आणून दिलं जातं. पुस्तक परत करण्यासाठीही लायब्ररीने कंपनीत ड्रॉप बॉक्स ठेवलेले असतात. अर्थात, पुस्तक ठरलेल्या वेळात वाचून परत देणं, चांगल्या स्थितीत ते परत करणं असे कुठल्याही लायब्ररीचे नियम इथेही लागू असतात.

ताण हलका होतो कंपनीतले वाचक कर्मचारी ऑफिसमध्येच आठवड्यातून एकदा चर्चेसाठी एकत्र जमतात. आठवड्याभरात वाचनात आलेले लेख, पुस्तकं यावर चर्चा केली जाते. यावेळी प्रत्येकजण आपण वाचत असलेल्या एका पुस्तकाविषयी माहिती सांगतो. यातून सहकर्मचाऱ्यांबरोबरचे संबंध दृढ होण्यास आणि कामाचा ताण कमी होण्यास मदत होते.

कर्मचाऱ्यांसाठी उत्तम पर्याय सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कर्मचाऱ्यांना वाचनासाठी खूप वेळ मिळतो. यावर अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी लायब्ररींची मदत घेऊन चांगला उपाय शोधून काढला आहे. शिकणं आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास या संकल्पनेतून ती जोपासण्याचा प्रयत्न केला जातोय. वाचनाची आवड असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही कल्पना आवडतेय. -निकेत करजगी, कॉर्पोरेट प्लॅनर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज