अ‍ॅपशहर

कविता ‘क्रॉसओव्हर’

आपल्याकडे एका भाषेतल्या कवितावाचनाचे कार्यक्रम अनेकदा होत असतात. पण, येत्या शनिवारी, म्हणजे १६ डिसेंबरला मुंबईमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात विविध भाषांतल्या कविता एकाच व्यासपीठावरुन सादर होणार आहेत.

Maharashtra Times 13 Dec 2017, 3:41 am
अजय उभारे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crossover poems
कविता ‘क्रॉसओव्हर’


आपल्याकडे एका भाषेतल्या कवितावाचनाचे कार्यक्रम अनेकदा होत असतात. पण, येत्या शनिवारी, म्हणजे १६ डिसेंबरला मुंबईमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात विविध भाषांतल्या कविता एकाच व्यासपीठावरुन सादर होणार आहेत.

आपल्याकडे एका भाषेतल्या कवितावाचनाचे कार्यक्रम अनेकदा होत असतात. पण, येत्या शनिवारी, म्हणजे १६ डिसेंबरला मुंबईमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात विविध भाषांतल्या कविता एकाच व्यासपीठावरुन सादर होणार आहेत. देशाच्या विविध प्रांतांतून येणारे नामांकित कवी या कार्यक्रमाची रंगात वाढवणार असून, जर्मन भाषेतल्या अनुवादीत कवितांचंही या कार्यक्रमात वाचन केलं जाणार आहे. साहित्यिक, कवींची उत्सुकता वाढवणाऱ्या या कार्यक्रमाचं नाव आहे ‘क्रॉसओव्हर पोएम्स’.

कवितांमधून व्यक्त होणारी भावना, त्यामागचे अर्थ या सगळ्याच गोष्टी रसिकांचं मनं जिंकून घेतात. कवितांची अशीच एक पर्वणी अनुभवण्याची संधी मुंबईकरांना यात मिळणार आहे. मॅक्सम्युलर भवन (जहांगीर आर्ट गॅलरीशेजारी) इथे सादर होणार आहे. या कार्यक्रमाचा हा चौथा प्रयोग असून, यापूर्वीच्या तीनही प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येतंय.

विविध राज्यांतले कवी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, मराठी, हिंदी, इंग्रजीसह जर्मन भाषेतल्या अनुवादित कवितांचं या कार्यक्रमात सादरीकण केलं जाणार आहे. मॅक्सम्युलर भवन, मुंबई आणि द पोएट्री क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम होतोय. मॅक्सम्युलर भवनच्या पहिल्या मजल्यावरच्या लायब्ररीत संध्याकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात मराठीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मराठीतले प्रख्यात कवी वैभव जोशी असतील. त्यांच्याबरोबर जम्मू-काश्मीरचा रमणिक सिंग, लखनऊचा मयांक सक्सेना, गोव्याची लवीना परेरा आणि मुंबईची मृणालिनी हरचंदराय हे सहभागी होणार आहेत. रोमँटिक, नॉस्टॅल्जिक अशी कवितांची विविध अंग काव्यरसिकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना कवी संकेत म्हात्रे यांची असून ते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करणार आहेत.

'कवितेच्या विश्वात जिथे शब्द एकत्र येतात, ती जागा आणि उपक्रम फार महत्त्वाचा असतो. आपली कविता किंवा साहित्य फक्त एखाद्या भाषेपुरतं मर्यादित न राहता ते सर्वदूर पसरवणं फार महत्त्वाचं असतं. क्रॉसओव्हरसारख्या उपक्रमांमुळे ते जाण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळते', असं कवी जोशी यांनी सांगितलं. ‘क्रॉसओव्हर पोएम्स’चा पहिला प्रयोग ठाण्यात झाला होता. त्यानंतर मुंबईतला तिसऱ्या प्रयोगही छान रंगला होता. तरुणांकडून या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचंही आयोजकांकडून सांगण्यात आलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज