अ‍ॅपशहर

वेळीच घाला लगाम

आमली पदार्थ, दारु, धुम्रपान यांचं व्यसन करणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढलंय. पूर्वी साधारण २० वर्षानंतरच्या तरुण मंडळींमध्ये हे प्रमाण वाढत होतं. मात्र आता कुमारवयीन मंडळींची पाऊलं ही या चुकीच्या मार्गाकडे वळतायंत. हे करण्यामागचं कारण प्रामुख्याने स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारा ताण हे असतं.

Maharashtra Times 23 Nov 2016, 12:32 am
डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ, केईएम हॉस्पिटल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम get away from bad habbits
वेळीच घाला लगाम


आमली पदार्थ, दारु, धुम्रपान यांचं व्यसन करणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढलंय. पूर्वी साधारण २० वर्षानंतरच्या तरुण मंडळींमध्ये हे प्रमाण वाढत होतं. मात्र आता कुमारवयीन मंडळींची पाऊलं ही या चुकीच्या मार्गाकडे वळतायंत. हे करण्यामागचं कारण प्रामुख्याने स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारा ताण हे असतं. एवढंच नाही तर समवयीन मुलं व्यसन करतात म्हणून आपण पण प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे, हे ही एक कारण असतं. हे सगळं पालकांच्या नकळत केलं जातं. पालकांना आपल्या पाल्याच्या या सवयीबद्दल पुसटशीही कल्पना नसते. तुमचा पाल्य अशा चुकीच्या मार्गावर जात आहे का? असेल तर ते कसं ओळखावं? हे आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती घेऊयात.

व्यसनाधीन कुमारवयीन मुलांना आपल्या पेहरावाबद्दल निष्काळजी असतात. बहुतेक करुन ओंगळवाणा पेहराव या व्यसनाधीन मंडळींचा असतो. एवढंच नाही तर त्यांना स्वच्छता अप्रिय असते. लालबुंद डोळे, हाता-पायांवर जखमा, हाताच्या बोटांवर आणि ओठांवर भाजलेल्याच्या खुणा अशीही लक्षणं आढळतात.
काही सवयी किंवा क्रिया

दात खराब होणं

शरीराला धुम्रपानाचा वास येणं

वास टाळण्यासाठी सतत च्युइंग गम चघळणं

डोळ्यांचा लालपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करणं

सतत चिडचिड करणं

विनाकारण राग येणं

सातत्याने पैशांची कमतरता भासणं

कशीही गाडी चालवणं, सतत अपघात

अचानक भूक लागणं

रात्री-अपरात्री घराबाहेर जाणं

व्यसनाधीन मुलांमधील वागणुकीतील बदल

कुटुंब आणि मित्रपरिवारापासून लांब राहणं

नातेवाईकांना टाळणं

भावनिक अस्थैर्य

क्षुल्लक गोष्टींवर हसायला येणं

शांत राहणं

व्यवस्थित बोलता न येणं

निद्रानाश

या सगळ्या लक्षणावरुन किंवा वागणूकीतील बदलांवरुन आपला पाल्य चुकीच्या मार्गावर तर जात नाही ना हे पालक पडताळू शकतात. जेणेकरुन वेळीच या सगळ्या गोष्टींवर लगाम बसून पाल्याचं भविष्य उज्वल होईल.
संकलन- शब्दुली कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज