अ‍ॅपशहर

देवदूत

कुठलंही संकट आलं की मुंबईकरांचं मदतीचं ‘स्पिरीट’ जागं होतं. कालही पावसानं जोर धरला आणि जसजसं परिस्थिती गंभीर होऊ लागली तसतशी काही तरुणांनी रस्त्यावर उतरुन लोकांना मदत करायला सुरुवात केली. अडचणीत सापडलेल्या अशाच काही तरुणांविषयी…

Maharashtra Times 31 Aug 2017, 3:21 am
कुठलंही संकट आलं की मुंबईकरांचं मदतीचं ‘स्पिरीट’ जागं होतं. कालही पावसानं जोर धरला आणि जसजसं परिस्थिती गंभीर होऊ लागली तसतशी काही तरुणांनी रस्त्यावर उतरुन लोकांना मदत करायला सुरुवात केली. अडचणीत सापडलेल्या अशाच काही तरुणांविषयी…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम helping people
देवदूत


माझ्याशी संपर्क साधा
गेल्या दोन दिवसात विनायक कदम हे नाव फेसबुकवर बरंच व्हायरल होतंय आणि त्यामागचं कारणही तसंच आहे. रेल्वेमार्ग ठप्प अशी बातमी सोशल मीडियावर दिसू लागली अन् विनायकनं 'कुठल्याही मदतीची गरज असेल तर माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला मदत करेन' असा मेसेज फेसबुकवर पोस्ट केला आणि काही क्षणातच त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येकानं आपले संपर्क क्रमांक त्याच्यासोबत शेअर केले आणि बऱ्याच जणांना यामुळे मदतही मिळाली.

जेवण पुरवलं
पावसामुळे निर्माण झालेल्या या बिकट परिस्थितीत रोटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थी मित्रांनीही मदतीचे हात पुढे केले. तब्बल ३०० रोटरॅक्टर्स स्वतः जलमय भागात उतरून प्रवाशांना जेवण, पिण्याचं पाणी पुरवत होते. एका गुरूद्वाराच्या मदतीनं यांनी टाटा रुग्णालयामध्ये अडकलेल्या लोकांना जेवण पुरवलं. सोशल मीडियाच्यामार्फत बऱ्याच रोटरॅक्टर्सचा संपर्क क्रमांक देत अडलेल्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती.

कॅम्पस खुले
बऱ्याच कॉलेजांच्या प्रशासनानं या कठीण परिस्थितीत आपापल्या कॉलेजांचे कॅम्पस, हॉस्टेल्स लोकांसाठी खुले केले होते. कॉलेजची तरूण मंडळीही मदत करण्यामध्ये हिरीरीने पुढाकार घेत होते. पाण्यात अडकलेल्या एखाद्या वृद्ध महिलेला मदत करण्यापासून लहान मुलांना खांद्यावर घेऊन वाट काढून देण्यात हे विद्यार्थी पुढे होते.

उत्साहानं मदत
शीख तरूणांचा एक समूहसुद्धा पाण्याच्या बाटल्या, बिस्कीटांचे पुडे घेऊन रस्त्यावर उतरला होता. छातीपर्यंत पाणी असतानाही हा ग्रुप मात्र उत्साहाने मदत करत होता. कुणालाही मदत करताना जात, धर्म, पंथ या गोष्टींमुळे काही फरक पडत नसतो हा संदेश जणू यातून मिळत होता.

माझ्या घरी या
वंदना टॉकीजकडे राहणाऱ्या अथर्व कुलकर्णी या तरूणानं फेसबुकची साथ घेत मदतीचा संदेश पुढे सरकवला. ‘ठाण्याजवळ अडकलेल्या प्रवांशानी न लाजता माझ्या घरी यावे’ अशी पोस्ट करत त्यानं मदतीचा हात पुढे केला. याशिवाय हा तरुण स्वतः कमरेपर्यंत पाण्यात उतरत आपल्या दुचाकीने लोकांना इच्छित स्थळी पोहोचवण्यास मदत करत होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज