अ‍ॅपशहर

ब्रेकअप झालाय ? खंबीरपणे पुन्हा उभे राहा एकटेपणा वाटत असेल तर या टिप्स फॉलो करा

नातेसंबंधात दुरावा निर्माण होणे कोणालाच सहन होत नाही. वेळेनुसार आपल्याला माणसाची सवय होते. काही वेळाने तो माणूस आपल्या आयुष्यात नसल्यावर आपल्याला त्रास होतो. आपल्यापैकी बरेच जण ब्रेकअपला सामोरे जात असतील. पण जर काही करुन तुम्ही या गोष्टीमधून बाहेर पडायचे असेल तर या काही टिप्स फॉलो करा.

Authored byमृणाल पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2022, 9:31 pm
जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हाला सर्वच गोष्टी खूप सुंदर दिसत असतात. परंतु कधीकधी काही कारणांमुळे नाते पुढे जात नाही आणि काही कारणांमुळे जोडप्यांमध्ये ब्रेकअप होते.अशा परिस्थितीत काही जण दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to improve yourself after a breakup
ब्रेकअप झालाय ? खंबीरपणे पुन्हा उभे राहा एकटेपणा वाटत असेल तर या टिप्स फॉलो करा


पण ब्रेकअपनंतर त्या दुःखातून बाहेर पडणे फार कठीण होऊन बसते.लोकांना अचानक हार्टब्रेक झाल्यानंतर काहीजण एकटे राहण पसंत करतात, शांत राहणे, मित्र आणि कुटुंबापासून दूर जाणे, हे सर्व ब्रेकअप नंतर दुष्परिणाम होऊ शकतात. यावेळी तुम्ही या काही टिप्स फॉलो करू शकता.
(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​ब्रेकअपनंतर जोडीदाराच्या सोबत राहू नका

जोडीदारासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय तुमचा असला तरी ब्रेकअपनंतर तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. तुटलेल्या नात्याच्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ते तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर काढावे लागेल. त्यांना सोशल मीडियावर स्टॉक करू नका. तुमचे मन शांत ठेवा आणि आयुष्यात पुढे जा.

(वाचा :- म्हणून ‘या’ वयाच्या पुरूषांकडे लोहचुंबकासारख्या आकर्षित होतात महिला, या पुरूषांच्या लग्नाचे चान्सेस कायम जास्तच)

​स्वतःला व्यस्त ठेवा

जोडीदारासोबत ब्रेकअप झाल्यानंतर एकटेपणा जाणवू लागतो. त्यांच्यासोबतच्या नात्यात घडलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी लक्षात ठेवतात. अशा परिस्थितीत तुमची पोकळी भरून काढण्यासाठी तुम्ही व्यस्त राहणे फार महत्वाचे आहे. अभ्यास, नोकरी, पुस्तके वाचणे आणि इतर कामांतून तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवू शकता.

(वाचा :- Harmful Relationships : सावधान, या 4 प्रकारच्या लोकांपासून कायम राहा 100 हात दूर, नाहीतर बरबाद करतील आयुष्य..!)

​कुटुंब आणि मित्रांसाठी वेळ काढा

तुमच्या जोडीदारासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हे नक्की लक्षात ठेवा की तुमची फॅमिली तुमच्या सोबत आहे. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता किंवा त्यांच्याशी बसून बोलू शकता. त्यांच्या सोबत वेळ घालवा यामुळे तुम्हाला बरं वाटेल.

(वाचा :- माझी कहाणी : माझे वय 26 वर्षे असून मी एक मोठा धक्कादायक निर्णय घेतलाय, कारण समजल्यावर तुम्हीही माझीच बाजू घ्याल)

​भान गमावू नका

जोडीदाराशी ब्रेकअप झाल्यानंतर अनेकदा लोक स्वतःला सांभाळू शकत नाहीत आणि रात्रंदिवस त्याच्या आठवणीत हरवून जातात. अशा स्थितीत लोक चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होऊ लागतात आणि काही वेळा त्रास कमी करण्यासाठी दारू, सिगारेट, ड्रग्ज यांसारखे पदार्थ सेवन करू लागतात, पण दुखात भान गमावू नका आणि चुकीच्या गोष्टी करु नका.

(वाचा :- तब्बल 23 वर्ष माधुरी दीक्षितला खुश ठेवण्यासाठी मिस्टर नेने करतायत ही 5 कामे, फॉलो करा, संसार कधीच तुटणार नाही)

लेखकाबद्दल
मृणाल पाटील
"मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. "... आणखी वाचा

महत्वाचे लेख