अ‍ॅपशहर

Long Distance Relationship Benefits : लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचे फायदे देखील असतात, ५ वा फायदा मजेशीर

लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चांगल की वाईट हे सांगण बहुदा कठीण असेल. पण प्रत्येक नात्याला दोन बाजू असतात. दोन्ही बाजू समजून घेतलं की ते नातं सांभाळणं अतिशय सोपं जातं. एकमेकांपासून लांब राहण्याचे तोटे आहेत तसेच फायदे देखील आहेत. नातं अधिक खुलायला हे लाँग डिस्टन्स अतिशय चांगल्यापद्धतीने मदत करतं.

Authored byदक्षता समीर घोसाळकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2022, 12:46 pm
आतापर्यंत तुम्ही लाँग डिस्टेंस रिलेशनशिपचे नुकसानच ऐकले असतील. असं म्हटलं जातं की, दुरावा तुमचं रिलेशनशिप खराब किंवा कमकुववत. मात्र असा अनुभव प्रत्येकालाच असतो असं नाही. अनेकदा लाँग डिस्टन्स रिलेशनशिप तुमचं नातं अधिक खुलवू शकतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम long distance relationship benefits is positive way
Long Distance Relationship Benefits : लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचे फायदे देखील असतात, ५ वा फायदा मजेशीर


लाँग डिस्टन्स सुरू होण्यापूर्वीच विचार केला जातो की, हे नातं टिकेल की नाही. पण हे चुकीचं आहे. उलट या नात्यात तुम्हाला स्वतःला टेस्ट करण्याची संधी मिळते. आपण आपल्या पार्टनरबद्दल किती लॉयल आहोत. या नात्यात राहिल्यामुळे तुमची समर्पणाची भावना वाढते. अशावेळी जोडीदाराला भेटण्याची ओढ देखील कायम असते. आताच्या काळात अनेक लोकं ही पद्धत स्वीकारत देखील आहेत. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)

​खऱ्या प्रेमाची व्याख्या

कायम असा विचार केला जातो की, दूर राहिल्यावर प्रेम व्यक्त करता येत नाही. पण खरंतर हीच योग्य संधी असते. लांब राहून अधिक प्रकर्षाने प्रेम व्यक्त करता येतं. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये खऱ्या प्रेमाचा अर्थ कळतो. यामुळे प्रेम वाढतं आणि नातं मजबूत होतं.

(वाचा - प्यारवाली लव्ह स्टोरीचा अंत नको, गोष्टी घटस्फोटापर्यंत आल्या असतील तर या ५ गोष्टी कराच) )

​स्वतःची ओळख नव्याने होते

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहण ही स्वतःची नव्याने ओळख करून घेण्यासारखी आहे. या नात्यातून तुमचा सच्चेपणा कळतो. तुम्ही तुमच्या नात्यात किती आकंठ बुढाला आहात याची जाणीव होते. स्वतःबद्दल एक आत्मविश्वास वाढतो.

(वाचा - ब्रेकअप झालंय? मग खचून जाऊ नका, फक्त करा 'ही' कामं अन् व्हा स्ट्रेस फ्री..!) )

​प्रेम वाढतं

एकमेकांपासून लांब राहून नातं दुरावतं असं वाटतं असलं तरी खऱ्या अर्थाने प्रेम वाढतं. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो. एकमेकांची ओढ असते. एकमेकांच्या वेळेची किंमत असते. आपुलकी, स्पर्श किती महत्वाचा आहे याची जाणीव होते.

(वाचा - Sohail Khan - Seema Khan Divorce : सोहेल खान - सीमा खानकडून घटस्फोट दाखल, २४ वर्षांचं नातं तुटण्यामागे ही असू शकतात कारण) )

​एक्साइटमेंट वाढते

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुमची नात्यातील एक्साइटमेंट कायम असते. एकमेकांच्या जवळ असल्यावर लवकर कंटाळण्याची शक्यता अशते. मात्र जेव्हा एकमेकांपासून दूर असतात तेव्हा पार्टनरच्या भेटीची ओढ असते. जोडीदाराला भेटण्याची इच्छा आणि उत्सुकता दोन्ही असते.

(वाचा - तुमच्या पार्टनला करा खूश, हनिमूनला जात असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा) )

​वाद कमी होतात

जेव्हा तुम्ही जोडीदारापासून लांब राहता तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद टाळले जातात. मात्र जेव्हा तुम्ही लांब असतात तेव्हा तुमचं बोलणं महत्वाचं असतं. तुमची वेळ महत्वाची असते. त्यामुळे वाद टाळले जातात आणि एकमेकांना वेळ दिला जातो.

(वाचा - नात्यात घ्या एक छोटासा ब्रेक, रिफ्रेश होईल तुमचं लव लाइफ) )

लेखकाबद्दल
दक्षता समीर घोसाळकर
"दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 11 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख