अ‍ॅपशहर

अभिवाचनातून संगीतानुभव

'संगीत मंदारमाला', 'संशयकल्लोळ', 'मत्स्यगंधा' यासारख्या संगीत नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. याच नाटकांना अभिवाचन आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न डोंबिवलीमध्ये वेध अकादमीद्वारे करण्यात आला

Maharashtra Times 27 Sep 2017, 3:49 am
आदित्य बिवलकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sangeet mandarmala
अभिवाचनातून संगीतानुभव


'संगीत मंदारमाला', 'संशयकल्लोळ', 'मत्स्यगंधा' यासारख्या संगीत नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. याच नाटकांना अभिवाचन आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न डोंबिवलीमध्ये वेध अकादमीद्वारे करण्यात आला

'संगीत मंदारमाला', 'संशयकल्लोळ', 'मत्स्यगंधा' यासारख्या संगीत नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. याच नाटकांना अभिवाचन आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न डोंबिवलीमध्ये वेध अकादमीद्वारे करण्यात आला असून संगीत सौभद्र, संगीत मंदारमाला ही गाजलेली नाटकं त्यांनी अभिवाचनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणलेली आहेत. संगीत नाटकाची परंपरा असलेल्या राज्यात अनेक ज्येष्ठ गायक, लेखक, कवी यांचे योगदान आहे. संगीत शाकुंतल, मानापमान अशा अनेकविध नाटकांच्या स्मृती नाट्यप्रेमींकडून आजही जपल्या जातात. मात्र तरुणाईला या नाटकांबद्दल विशेष माहिती असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे तरुणांपर्यंत या कलाकृती पोहोचाव्यात यासाठी मूळ नाटकाच्या संहितेचं अभिवाचन करून आणि त्यांचं सादरीकरण करण्याचा प्रयोग वेधद्वारे करण्यात आला आहे. याचं दिग्दर्शन संकेत ओक यांनी केलं असून नवीन कलाकारांच्या संचासह हे प्रयोग सादर केले जातायत.

नाट्यरुपात हा प्रयोग सादर न होता तो अभिवाचनातून सादर केला जातो. अनेक वर्षांपूर्वी रेडिओवर गाजणारी नभोनाट्य ही संकल्पना अधोरेखित करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत आहे. नाटकातील संवादाचे अभिनयासहित वाचन आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या नाट्यपदांचे सुरेल गायन असा स्वरूपात हे प्रयोग रंगतात. नैपथ्य, प्रकाशयोजना अशा साधनांविरहित केवळ आवाज आणि प्रभावी वाचन या कलांच्या साथीने संपूर्ण नाटक कलाकार रसिकांपुढे सादर करतात. या नवीन प्रयोगाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून यापुढेही वेगवेगळी संगीत नाटकं याचस्वरूपात लोकांसमोर आणण्याची इच्छा असल्याचे संकेत ओक यांनी सांगितलं. वेधद्वारे नवीन कलाकारांना व्यासपीठ देऊन तरुणांपर्यंत आपली साहित्य आणि संगीत परंपरा पोहोचावी म्हणून हा प्रयोग केला जात असल्याचे ते म्हणाले. यापुढे 'कट्यार काळजात घुसली' याच स्वरूपात लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज