अ‍ॅपशहर

महिलांना मुठीत ठेवण्याच्या वृत्तीमुळे बिघडू शकते पती-पत्नीचे नाते, कसा राखावा समतोल?

पती -पत्नीच्या नातेसंबंधात अधिक चांगली समज आणि समानता असणे खूप महत्त्वाचे आहे.

Curated byTanaya | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2021, 8:49 pm
वैवाहिक नातेसंबंधात पती - पत्नी दोघांच्याही समजूतदारपणासह उत्तम संवाद होणंही आवश्यक असते. परंतु आजही वैवाहिक जीवनात बहुतांश वेळा महिलांनीच त्याग आणि तडजोड करावी, अशी अपेक्षा केली जाते. त्याचबरोबर लग्नानंतर त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या लादण्याव्यतिरिक्त त्यांच्यासाठी मर्यादाही घालून दिल्या जातात. अशा स्थितीत जरी पती-पत्नीचे नाते कायम राहिले तरी त्यांच्यात भांडणे आणि वाद वाढतात. यामुळे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते कमकुवत होऊ लागते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम these mistakes can break your husband wife relationship
महिलांना मुठीत ठेवण्याच्या वृत्तीमुळे बिघडू शकते पती-पत्नीचे नाते, कसा राखावा समतोल?


अशा परिस्थितीत आपल्या पत्नीवर वर्चस्व गाजवण्याऐवजी तिलाही तिच्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य द्या, कारण हा तिचाही हक्क आहे. या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया कोणकोणत्या कारणांमुळे तुमचे पत्नीसोबतचे नाते कमकुवत होऊ शकते. (फोटो क्रेडिट्स - इंडिया टाइम्स)
(Rupali Ganguly अभिनेत्याऐवजी 'अनुपमा'तील रुपाली गांगुलीनं खास मित्रासोबत केलं लग्न, कारण…)

​​पत्नीच्या जीवनाचे निर्णय स्वतः घेऊ नका

जेव्हा तुम्ही पत्नीच्या आयुष्याबद्दल स्वतः निर्णय घेण्यास सुरुवात करता, तेव्हा तुम्ही तिच्याकडून तिचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करता हे लक्षात घ्या. तुमचे निर्णय पत्नीवर लादण्याचा प्रयत्न केल्याने तुमच्या नात्यात अंतर निर्माण होऊ शकते. जेव्हा तुम्ही असे वागता त्यावेळेस तुम्ही पत्नीचं महत्त्व कुठेतरी कमी करण्यासह नातेसंबंधातील तिचे अस्तित्वच मिटवण्याचा प्रयत्न करता. म्हणूनच महिलांना अशा नात्यामुळे बंधनात राहिल्यासारखे वाटते. बदलत्या काळानुरूप हळूहळू पत्नी व तुमच्यात नात्यात कटुताही वाढू लागते.

(काजोलसोबतच्या अफेअरच्या वृत्तावर बोलताना शाहरुखनं पत्नीबद्दल केलं हे विधान, वाचा पुढे काय घडलं?)

​​पत्नीच्या मनातील गोष्ट ऐकणं गरजेचं

आपल्या जोडीदाराला समजून घेणे ही आपली जबाबदारी आहे. पती बहुतांश वेळा स्वतःच्याच मनातील गोष्ट पत्नीला सांगत राहतो, पण तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. एका चांगल्या नात्यामध्ये पती - पत्नीनं एकमेकांच्या भावनांचा आदर करणं महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत आपल्या पत्नीची बाजू जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करावा, तिला काय हवंय- नकोय हे माहिती करून घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा.

(ईशा अंबानीचा पाठवणीचा क्षण आठवून खूपच भावूक झाले होते मुकेश अंबानी, वडिलांना कसली असते काळजी?)

​पेहरावावर निर्बंध नकोत

विवाहानंतर महिलांना अनेक नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. या यादीमध्ये सर्वात पहिला नियम कपड्यांसंदर्भातील असतो. आजही कित्येक घरांमध्ये पत्नीला तिच्या इच्छेनुसार कपडे घालण्याची परवानगी नाही. सासू-सासरे आणि पती तिला साडी किंवा ड्रेस घालण्याचा सल्ला देतात. याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. लग्नानंतर किंवा लग्नापूर्वी मुलीला तिच्या जीवनशैलीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.

(करीना कपूर पतीच्या गर्भवती बहिणीशी अशी वागायची, सोहानं सांगितलं नणंद-वहिनीच्या नात्यातील मोठे सत्य)

​नोकरीसाठी असते वेळेचे बंधन

लग्नानंतर मुलींना नोकरी करणे अवघड झाले आहे, असे मुळीच नाही. शहरांमधील बरेच लोक आता नोकरी करणारी सूनच घरात यावी अशी इच्छा बाळगतात, परंतु यामध्येही त्यांचे नियम असतात. अनेक मुले नोकरी करणारी पत्नी हवी असे सांगतात, पण कामाच्या शिफ्टची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असावी, अशीही त्यांची अट असते. यामुळे कित्येक मुलींना लग्नानंतर नोकरी सोडावी लागते. यामुळे घटस्फोट झाल्याचीही कित्येक प्रकरणे पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुमच्याप्रमाणे तुमच्या पत्नीलाही नोकरी करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

(‘आम्ही लहान होतो, जेव्हा त्या आमच्या आयुष्यात आल्या’ सावत्र आईसह असे आहे सलमानच्या भावाचं वर्तन)

लेखकाबद्दल
Tanaya

महत्वाचे लेख