अ‍ॅपशहर

टायगर पॉइंट अन् कटिंग चहा!

लाडक्या सेलिब्रेटींच्या वाढदिवसाची उत्सुकता तुम्हालाही असेलच. चला तर मग दोस्तांनो, 'बर्थडे स्पेशल' या नव्या सदरांतर्गत त्यांचे वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. या माध्यमातून सेलिब्रेटी त्यांच्या आठवणीत राहिलेल्या वाढदिवसाचे गंमतीदार किस्से मुंटाच्या वाचकांशी शेअर करणार आहेत. आज 'कच्चा लिंबू'फेम मनमित पेम याचा बर्थडे असून त्याने केलेली गंमत...

Maharashtra Times 23 Sep 2017, 12:23 am
आतापर्यंत प्रत्येक वाढदिवसाला काही ना काहीतरी सरप्राईज मिळत गेलं. लहानपणी माझ्या वाढदिवसाला घराजवळचे आणि शाळेतले मित्र घरी धमाल-मस्ती करायला यायचे. मग आम्ही दमशेराज, संगीत खूर्ची असे खेळ खेळायचो. मोठ्या फुग्यात चॉकलेट घालून हवा भरून वर लावून फोडायचो. आवाजाची भीती वाटत असूनही फक्त चॉकलेट मिळवण्यासाठी ही स्पर्धा असायची. वाढदिवसाच्या दिवशी घरासमोरच्या अंगणात दुपारी सगळ्यांचा एकत्र दंगा सुरू व्हायचा तो रात्री उशीरापर्यंत चालू असायचा. तसच सुपरमॅन, बॅटमॅन, कॅप्टन अमेरिका अशा अॅक्शन मॅनचे खेळ इतर दिवशी मिळत नव्हते. पण असे खेळ मिळण्याचा हक्काचा दिवस म्हणजे वाढदिवस.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tiger point and cutting chai
टायगर पॉइंट अन् कटिंग चहा!

गेल्या वर्षी माझ्या मित्रांनी मला रात्री घरी येऊन सरप्राइज दिलं. जवळजवळ तीस जण होते. अख्ख घर भरलं होतं. रात्री माझ्यासाठी दोन केक आणले होते. एक खायला आणि एक तोंडावर फासायला. मला आवडते म्हणून आईने बिर्याणी केली होती. माझ्या मित्रांचा आणि घरच्यांचा हा एकत्र प्लॅन ठरला होता हे मलानंतर कळलं. शाळेपासूनचे जुने मित्र आणि कॉलेजमधले नवीन मित्रही आले होते. एकमेकांना कॉन्टॅक्ट करून तेही एकत्र जमले होते, याचा आनंद झाला. त्या वर्षी पहिल्यांदाच नातेवाईकही आले होते, ते पण रात्री बारा वाजता. त्यानंतर आम्ही सगळे गाड्या आणि बाइक्स घेऊन लोणावळा टायगर पॉइंटला गेलो होतो. तिकडे खूप धम्माल केली. सकाळी परतताना छान टपरी वरचा चहा प्यायलो. तो माझा सगळ्यात सुंदर वाढदिवस होता. पण या वर्षी तो रेकॉर्ड मोडणार आहे. कारण आता आयएनटी (INT) एकांकिका स्पर्धेच्या तालमी सुरू आहेत. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी मी तालीम करण्यात व्यग्र असणार आहे. जे माझं सगळ्यात आवडतं काम आहे. आजच्या दिवसाचं मला खूप उत्सुकता आहे.
शब्दांकन- दीपश्री आपटे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज