काय आहे पोस्ट
विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्काने त्याच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने आज तुझा वाढदिवस आहे त्यामुळे साहजिकच, मी या पोस्टसाठी तुझे सर्वोत्तम अॅन्गल असणारे आणि फोटो निवडले आहेत. तुझ्यावर प्रत्येक रुपात आणि स्वरुपात मी प्रेम करणार आहे असं म्हणतं तीने सोशल मीडियावर विराटचे काही फोटो शेअर केले आहेत.
(वाचा :- ग्राऊंडवर केलं प्रपोज, चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही 'या' 6 भारतीय क्रिकेटपटूंची लव्हस्टोरी)
बेडवर झोपलेल्या विराटचा फोटो
या पोस्टमध्ये अनुष्काने बेडवर झोपलेल्या विराटचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट विचित्र पोज देऊन झोपलेला पाहायला मिळत आहे. तर या सोबतच अनुष्काने इतर काही फोटो देखील शेअर केले आहेत.
नक्की आहे तरी काय पोस्टमध्ये
कायम एकमेकांच्या सोबत
अनुष्का आणि विराट नेहमीच एकमेकांसोबत पाहायला मिळते. आयुष्यातील चढ उताराच्या क्षणांमध्ये ते दोघांही एकमेकांसोबत असतात. तुम्ही देखील या पॉवर कपलमधला हा गुण आत्मसात करु शकता. आणि तुमच्या जोडीदाराला खूश ठेवू शकता. आयुष्यात अनेक संकटे येतात पण अशात आपल्या जोडीदाराचा हात घट्ट पकडून ठेवायाचा असतो. ही गोष्ट तुम्ही देखील शिकू शकता.
समजून घेणे
आपल्या आयुष्यात आपल्याला कोणती समजून घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. हीच गोष्ट अनुष्का आणि विराट यांच्या बाबतीतसुद्धा झाली आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांना ते दोघं धिराने सामोरे जाताना दिसतात. माणसाला आयुष्यात आपल्याला कोणतरी समजून घेणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असावा असे वाटत असते. जर तुमच्या जोडीदाराला तुम्ही समजू घेऊ शकत असाल तर या गोष्टीहून सुंदर कोणतीच गोष्ट नाही.
अनुष्काचे प्रेम
तुमच्या प्रियव्यक्तीला वेळ द्या
अनुष्का आणि विराट त्यांच्या कामातून वेळ काढून कुटुंबाला वेळ देतात. कितीही काम असलं तरी वामिका सोबत ते नेहमी वेळ घालावताना दिसतात. तुम्ही देखील तुमच्या बिझी आयुष्यातून तुमच्या परिवाराला वेळ द्या. कामच्या व्यापात आपण आपल्या व्यक्तीला वेळ देत नाही. त्यामुळे तुमची जवळच्या व्यक्तीला वेळ द्या. तो व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे ही गोष्टी त्याला सांगणे गरजेचं आहे.
अनुष्का शर्मा प्रत्येक पावलावर सोबत
विराटच्या चांगल्या आणि वाईट काळात अनुष्का शर्माला पाहिले गेले. सप्टेंबर २०२२ मध्ये, जेव्हा विराट कोहलीने ७१ वे शतक पूर्ण केले, तेव्हा अनुष्काने अभिमानास्पद भावना पोस्ट केली ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. विराटच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत अनुष्का शर्माने त्यावेळी लिहिले - 'मी तुझ्यासोबत नेहमीच आणि प्रत्येक पावलावर असेन.' अशी कॅप्शन शेअर केली होती.