अ‍ॅपशहर

सावधान! बॉडी स्मेलमुळे होतो ब्रेकअप

तुम्ही नुकतेच कुणाच्या तरी प्रेमात पडला असाल आणि जर तुमच्या शरीराला दुर्गंधी येत असेल तर सावधान! कारण बॉडी स्मेलमुळे प्रेमात ब्रेकअप होत असल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून पुढे आली आहे. त्यामुळं तुमच्याकडं कितीही पैसा असेल, कितीही महागड्या गाड्या असतील आणि तुम्ही दिसायला कितीही सुंदर असाल... पण बॉडी स्मेल चांगला नसेल तर तुमची खैर नाही...

Maharashtra Times 29 Apr 2017, 11:37 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम body smell play a big role to make your partner mood
सावधान! बॉडी स्मेलमुळे होतो ब्रेकअप


तुम्ही नुकतेच कुणाच्या तरी प्रेमात पडला असाल आणि जर तुमच्या शरीराला दुर्गंधी येत असेल तर सावधान! कारण बॉडी स्मेलमुळे प्रेमात ब्रेकअप होत असल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून पुढे आली आहे. त्यामुळं तुमच्याकडं कितीही पैसा असेल, कितीही महागड्या गाड्या असतील आणि तुम्ही दिसायला कितीही सुंदर असाल... पण बॉडी स्मेल चांगला नसेल तर तुमची खैर नाही...

व्हिक्टोरियन मिलन (extra-marital dating) या संकेतस्थळाने केलेल्या सर्व्हेतून ही माहिती पुढे आली आहे. आपल्या पार्टनरला फसवणाऱ्या १२ देशातील लोकांचा सर्व्हे करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. हा सर्व्हे करताना या संस्थेने महिलांना काही प्रश्न विचारले. त्यात त्यांनी अत्यंत धक्कादायक उत्तरे दिली. प्रियकर निवडताना त्याच्या बॉडी स्मेलला किती महत्त्व देता, असा प्रश्न महिलांना करण्यात आला होता. त्यात प्रियकराच्या शरीराला दुर्गंधी येत असेल तर त्याच्यासोबत रात्र घालविण्यापेक्षा घरी जाणे पसंत करू, असं ७८ टक्के महिलांनी सांगितलं. मात्र, पुरुषांनी यावर आपलं वेगळच मत नोंदवलं आहे. एकदा बेडरूममध्ये गेल्यावर स्मेलला काहीच अर्थ राहत नसल्याचं १० पैकी ५ पुरुषांनी सांगितलं.

५३ टक्के महिलांनी नॅचरल स्मेलवाले पुरुष आवडत असल्याचं सांगितलं. ६३ टक्के पुरुषांनीही हेच मत व्यक्त केलं. विशेष म्हणजे पुरुषांच्या शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे विवाह मोडल्याचं ५० टक्के महिलांनी सांगितलं. खराब स्मेलमुळे सेक्सचा आनंद घेता येत नाही, त्यामुळे ब्रेकअप होतो, असं या महिलांचं म्हणणं आहे. शरीराचा गंध आपल्या पार्टनरला उत्तेजित करत असतो. ब्रेकअप झाल्यावर अनेक वर्षानंतरही पार्टनरच्या शरीराचा गंध लक्षात राहतो, असे या संकेतस्थळाचे सीव्हीओ सिंगुर्ड वेडल यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज