अ‍ॅपशहर

​ आता व्हायग्रा घेण्याची गरज नाही!

तुम्ही इरेक्टाइल डिसफंक्शनमुळे (नपुंसकता) चिंताग्रस्त आहात? व्हायग्रा घेऊनही काहीच फरक पडत नाहीत? त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात ताणतणाव निर्माण झालाय? मग थांबा... निराश होऊ नका... इरेक्टाइल डिसफंक्शनवर मात करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ विसकोन्सिनने रिमोटवर चालणारे एक डिव्हाइस विकसित केले आहे. त्यामुळे तुम्हाला शरीरसुखाचा आनंद घेता येईलच; शिवाय व्हायग्रा खाण्याची वेळही तुमच्यावर येणार नाही.

Maharashtra Times 29 Nov 2016, 1:49 pm
मटा ऑनलाइन वृत्त । वाशिंग्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम this bionic penis can cure erectile dysfunction
​ आता व्हायग्रा घेण्याची गरज नाही!

तुम्ही इरेक्टाइल डिसफंक्शनमुळे (नपुंसकता) चिंताग्रस्त आहात? व्हायग्रा घेऊनही काहीच फरक पडत नाहीत? त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात ताणतणाव निर्माण झालाय? मग थांबा... निराश होऊ नका... इरेक्टाइल डिसफंक्शनवर मात करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ विसकोन्सिनने रिमोटवर चालणारे एक डिव्हाइस विकसित केले आहे. त्यामुळे तुम्हाला शरीरसुखाचा आनंद घेता येईलच; शिवाय व्हायग्रा खाण्याची वेळही तुमच्यावर येणार नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ विसकोन्सिनने रिमोटवर चालणारे धातूचे लिंग तयार केले आहे. गरम झाल्यावर ते आठ इंच लांब होते. उष्णतेमुळे हे डिवाइस क्रियाशील होते आणि बटन दाबताच दोन मिनिटात त्याचा वापर करता येतो. गरम किंवा थंड झाल्यावर त्याचा आकार कमी जास्त होतो. शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस झाल्यावर त्याची लांबी दोन इंचाने तर ४२ डिग्री सेल्सियसला ८ इंचाने वाढते, असे या युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून सिद्घ झाले आहे.

निटीनॉलने हे डिवाइस तयार करण्यात आले आहे. निकेल आणि टायटेनमच्या मिश्रण त्यात आहे. त्याला निटीनॉलच्या धातूची कोटींगही करण्यात आली आहे. त्यामुळे लिंगाच्याखाली त्याचे प्रत्यारोपण करणे डॉक्टरांना सहज शक्य आहे. या डिवाइसच्या एका बाजूला लवकर गरम होऊ शकणारी एक कॉइल लावण्यात आली आहे. पोट आणि जांघेच्या मधल्या भागावर ठेऊन त्याला रिमोटने सुरु करायचे. कॉइल गरम झाल्यावर त्यात करंट निर्माण होऊन डिवाइस गरम होते. त्यानंतर पुरेसे तापमान निर्माण झाल्यावर त्यांची लांबी वाढून ते सक्रिय होत असल्याचा दावा या युनिव्हर्सिटीने केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज