अ‍ॅपशहर

मी माझं लैंगिक जीवन आनंदीत बनवण्यासाठी काय करू शकतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2020, 9:49 pm
प्रश्न - माझं वय ३६ वर्षे आहे आणि माझी पत्नी ३२ वर्षांची आहे. आम्ही प्रेमविवाह केला आहे. पण माझी पत्नी संभोग करण्यास इच्छुक असतानाही मला मात्र सेक्सशी निगडीत कोणत्याही गोष्टीत रुची राहिली नाहीये. त्यामुळे पत्नीशी कायम वाद होतात. जरी आम्ही संभोग करण्याचा प्रयत्न केला तरी मला खूप कंटाळा येतो आणि मी एखाद्या मशिनीप्रमाणेच वागू लागतो. आम्ही गेल्या चार महिन्यांपासून संभोग केलाच नाही. मी पॉर्न देखील पाहत नाही. तरिही आम्ही कुठे बाहेर जातो तेव्हा माझी लैंगिक इच्छाशक्ती जागृक होते आणि आम्ही खूप चांगला संभोग करतो. मी एका सेक्सोलॉजिस्टचा सल्ला घेतला. ज्याने १५ दिवसांसाठी काही औषधे आणि पावडर दिली होती पण त्याच्याही काहीच फायदा नाही झाला. मला मधुमेह नाही. किंबहुना आम्ही दोघांचेही आरोग्य अगदी सुदृढ आहे. मी या समस्येवर काय उपाय करू शकतो?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम what can i do to make my sex life better in marathi
मी माझं लैंगिक जीवन आनंदीत बनवण्यासाठी काय करू शकतो?



उत्तर (महिंद्र वत्स) - तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वत:च दिलं आहे. जीवन हे तुमच्यासाठी कंटाळवाणं आणि एखाद्या मशिनप्रमाणे झाले आहे आणि याचा परिणाम तुमच्या लैंगिक जीवनावरही होत आहे. त्यामुळे तुम्हाला खूप वेळा बाहेर फिरायला गेलं पाहिजे आणि अशा गोष्टींचा विचार करायला हवा ज्या तुम्हाला आनंद देतात. सध्या सुट्टी घेणंही मुश्किलच होईल. त्यामुळे आपल्या जीवनशैलीला चांगली बनवण्याचा आणि बदलण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही तुमच्या नात्यात आणि लैंगिक आयुष्यात बदल झालेले पाहू शकता.

(वाचा :- कोणत्यातरी संक्रमणामुळे पत्नीच्या योनीमार्गात खाज येऊ लागली आहे. यावर काय उपाय करावा?)

महत्वाचे लेख