मलायकाला साडी मध्ये फार कमी पाहायला मिळते. पण तिच्या या लुकने साडीमध्ये सुद्धा किती हॉट आणि बोल्ड दिसता येऊ शकते हे पुन्हा एकदा दाखवून दिले. छोट्या कपड्यांतच हॉटनेस असतो ही संकल्पनाच जणू मलायकाच्या या बोल्ड फोटोंनी मोडित काढली आहे. असे काय होते तिच्या या लुकमध्ये आणि साडीमध्ये खास आणि तिचा हा लुक एकदम हटके का ठरला चला जाणून घेऊया.
मनीष मल्होत्राची खास डिजाईन
मलायकाने परिधान केलेल्या साडीची सर्वात मोठी स्पेशालिटी म्हणजे ही साडी प्रसिध्द फॅशन डिजाईनर मनीष मल्होत्रा यांनी डिजाईन केली आहे. त्यांनी डिजाईन केलेल्या कोणत्याही कपड्याला वेगळ्या कौतुकाची गरज नाही हे आपण जाणतोच. तर जो साडी तशी दिसायला सिम्पल आहे पण त्याची डिजाईन एकदम आकर्षक व लक्षवेधी आहे. तर अशा या डिजाईनर साडी सोबत मलायकाने बॅकलेस ब्लाउज परिधान केला होता. जो तिच्या लूकला खूप जास्त परफेक्ट बनवत तर होताच पण कम्प्लिट सुद्धा करत होता. ही लाइट ग्रीन किंवा पोपटी रंगाची साडी आणि त्यावरील कॉन्ट्रास्ट ब्लाउज प्रत्येक स्त्रीला शोभून दिसेल असाच डिझाईन केला आहे. बाजूची डायमंडची लेस आणि पदराला असलेले गोंडे या साडीची सुंदरता दुप्पट वाढवत आहे.
स्पेशल ज्वेलरी
साडी म्हटली की सोबत साजेशी ज्वेलरी सुद्धा आलीच. मलायकाने देखील आपल्या या साडी लुकला शोभून दिसेल अशीच ज्वेलरी परिधान केली होती. हातातील ब्रेसलेट आणि हेवी इयर पीस तिचा लूक अधिक मॉडर्न आणि आकर्षक बनवत होते. सध्या सर्वच अभिनेत्री मिनीमम ज्वेलरीवर भर देत आहेत. पूर्वी साडी नेसली की अभिनेत्री भरमसाठ ज्वेलरी अंगावर घेऊन वावरायच्या पण हळूहळू त्यांनाही कळून चुकले आहे की मिनीमम ज्वेलरी मध्येच लुक जास्त खुलून दिसतो आणि लोकांचं लक्ष ज्वेलरीपेक्षा त्या स्त्रीच्या नैसर्गिक सौंदर्य व अदांवर जास्त खिळते.
ट्रेडिशनल अवतार
या लुक सोबतच दिवाळी बॅश मध्ये मलायकाने अजून एक लुक कॅरी केला होता. हा लुक होता अगदी मराठमोळा पारंपरिक लुक, जेव्हा ती अर्जुन कपूर सोबत या लुक मध्ये पार्टीत पोहोचली तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. कारण मलायका अशा पारंपरिक अवतारात क्वचितच पहायला मिळते. पिंक कलरची साडी आणि ग्रीन ब्रालेट लुक मध्ये त्या पूर्ण पार्टी मध्ये मलायकाच सगळ्यात सुंदर दिसत होती. हे तिथे उपस्थित असणाऱ्या अन्य लोकांनी देखील मान्य केले. याशिवाय तिच्या साडी लुकवरून प्रियकर अर्जून कपूरला सुद्धा नजर हटवणं मुश्किल झालं होतं. तो तिच्या सौंदर्याच्या वर्षावात आकंठ बुडाला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
ब्लॅक ब्यूटी विथ सेक्सी पोझ
मलायकाला कोणताही लुक अगदी उठून आणि शोभून दिसतो याचे कारण म्हणजे तिची सुंदर आणि आकर्षक त्वचा होय. ती जरी अभिनेत्री म्हणून सध्या जास्त ऍक्टिव्ह नसली तरी तिने स्वतःची काळजी घेणे काही सोडलेले नाही. ती आपल्या त्वचेवर आणि फिटनेस वर खूप मेहनत घेत आणि म्हणूनच वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असून सुद्धा ती अगदी तिशीतल्या तरूणींनाही तगडी टक्कर देते. एक फिटनेस फ्रीक म्हणून सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव मलायका अरोरा हे आहे यातच सर्व काही आलं. या फोटोमध्येही भरघोस दागिणे नसले तरीही तिच्या त्या अदा फोटोला आकर्षक बनवत आहेत. सिम्पल साडीचे रंगीबेरंगी गोंडे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत. तुम्ही सुद्धा तिच्यासारखी साडी आणि मेकअप असा पारंपरिक अन् मॉर्डनचा मेळ खाणारा लुक नक्की ट्राय करू शकता.
मलायकाच्या सुंदर त्वचेचे रहस्य
मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल ना की काय आहे मलायकाच्या सौंदर्याचे रहस्य? तर ते आहे स्टीमिंग! त्वचेची काळजी घेण्यासाठी ती स्टीमिंगचा देखील वापर करते. तिला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा ती नऊ मिनिटे वाफ घेते. यानंतर स्कीनची स्वच्छता करते आणि त्वचेला मॉइश्चराइज देखील करते. असे केल्याने तिला इंस्टंट ग्लो मिळतो. स्टीमिंगमुळे त्वचेतील डेड सेल्स दूर होतात. जेव्हा स्टीमिंग नंतर तुम्ही त्वचा साफ करता तेव्हा आतील पेशी पूर्णपणे स्वच्छ होतात. तसेच वरील मृत पेशी निघून जातात.
बॅकलेस ब्लाउज आणि आयशॅडोची खासियत
मलायका उंच आणि सडपातळ असल्याने या साडीतून तिचा तो कमनीय बांधा अगदी ठळक दिसत आहे. गळा मोकळा असतानाही कानातल्या हेवी कानातल्यांनी सारी कसर भरून काढली आहे. मेकअप जास्त नसला तरीही डोळ्यांवर लावलेलं साडीला मॅचिंग असं ग्रीन, पोपटी आणि स्मोकी आयशॅडो एक कम्प्लिट लुक देत आहे. हातात एक कडा आणि अंगठीने पारंपारिक लुकला मॉर्डन टच दिला आहे. (फोटो साभार :- malaikaaroraofficial/manishmalhotraworld)