यामुळे केसांच्या भागातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीनं सुरू राहते. तेलाचा योग्य वापर केल्यास केसांची गळती कमी होईल. एरंडेल तेलामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुण आहेत. यामुळे निर्जीव झालेल्या केसांचीही समस्या दूर होण्यास मदत मिळते. शिवाय कोंडा, टाळूला खाज सुटण्याची समस्या कमी होते. तुम्हाला हवे असल्यास एरंडेल तेल अन्य तेलामध्ये मिक्स करूनही केसांना लावू शकता.
केसगळती कमी करण्यासाठी उपाय
सामग्री- एरंडेल तेल, आल्याचा रस
तेल लावण्याची पद्धत
केसांची चांगली वाढ व्हावी यासाठी एरंडेलच्या तेलामध्ये एक ते दोन मोठे चमचे आल्याचा रस मिक्स करा. हे मिश्रण आपल्या टाळू आणि संपूर्ण केसांना लावा. हे मिश्रण केसांवर २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि यानंतर हर्बल शॅम्पून केस स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय केल्यास केस गळती कमी होते. केस घनदाट आणि मजबूत होतील. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.
आल्याच्या रसाचे फायदे
आल्याच्या रसामुळे(ginger juice for hair ) नवीन केस येण्यास मदत मिळते. टाळूच्या भागातील रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीनं होते. तर एरंडेल तेलामुळे केसाचं खोलवर कंडिशनिंग होऊन पोषक घटकांचाही पुरवठा होतो. यामुळे केस गळतीचा त्रास कमी होतो. आल्याच्या रसामुळे टाळूची त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. आपल्या केसांचे आरोग्य टाळूच्या त्वचेवरच अवलंबून असते.
(चेहरा,हातांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय, ५ मिनिटांत तयार करा ५ स्क्रब)
कोंडा कमी करण्यासाठी
सामग्री - एरंडेल तेल, कोरफड जेल, टी ट्री ऑइल
मिश्रण लावण्याची पद्धत
आवश्यकतेनुसार एरंडेल तेल घ्या. त्यामध्ये दोन ते तीन चमचे कोरफड जेल मिक्स करा. आता यामध्ये टी ट्री ऑइलचे दोन ते तीन थेंब मिक्स करा. हे मिश्रण आपल्या केसांना चांगल्या पद्धतीनं लावा. ३० ते ४० मिनिटांनंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करा. यामुळे तुमच्या केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळेल.
(ऐश्वर्या रायच्या सुंदर चेहऱ्याचं सीक्रेट, त्वचेसाठी वापरते सर्वात स्वस्त गोष्ट)
कोरफड जेलचे फायदे
कोरफड जेलमध्ये केसांसाठी पोषक असलेले घटक भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे केसांना ओलावा मिळतो. केस निर्जीव आणि कोरडे होत नाहीत. या व्यतिरिक्त 'व्हिटॅमिन सी'(Vitamin C) मुळे केसांमधील कोंडा कमी होतो. केसांमध्ये येणारी खाज कमी होते. एरंडेल तेल आणि कोरफड चे मिश्रण तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी ठेवते.
(Hair Care Tips रात्रभर केसांवर लावा हे हेअर मास्क, सकाळी दिसतील आश्चर्यकारक बदल)
टी ट्री ऑइलमुळे केसांची होते वाढ
टी-ट्री ऑइलमध्ये अँटी सेप्टिक, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. यामुळे कोंड्याची समस्या कमी होते. केसांमध्ये जमा झालेली धूळ, माती, दुर्गंध स्वच्छ होते. केसांची चांगली वाढ होते. केसांवर चमक देखील येते.
(Hair Wash: गरम पाण्यानं केस धुण्याची चूक करू नका,पडू शकतं टक्कल)
एरंडेल तेल केसांसाठी वरदान
केसांच्या वाढीसाठी
सामग्री- एरंडेल तेल, बदामाचे तेल, मेहंदीचे तेल
तेल लावण्याची पद्धत
एका छोट्या वाटीमध्ये एरंडेल तेल (Castor Oil For Hair) आणि बदामाचे तेल (almond oil benefits) सम प्रमाणात घ्या. ही वाटी गरम पाण्यामध्ये ठेवा. यामुळे तेल कोमट होईल. तेल अति प्रमाणात गरम करून केसांना लावण्याची चूक करू नका.
(Hair Pack केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय,लसूणमध्ये या ३ गोष्टी मिक्स करून वापरा हेअर मास्क)
केसांसाठी रामबाण उपाय
आता यामध्ये मेहंदीच्या तेलाचे काही थेंब मिक्स करा. हे तेल चांगल्या पद्धतीनं केसांना लावा. ३० ते ४० मिनिटांसाठी तेल आपल्या केसांमध्ये राहू द्यावे. केस धुण्यासाठी हर्बल शॅम्पूचा वापर करा. हा उपाय केल्यास तुमच्या केसांची चांगली वाढ होईल. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करा. केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल.
(आठवड्यातून एकदा केस आणि त्वचेवर लावा मेथी पॅक, मिळतील जबरदस्त फायदे)