अ‍ॅपशहर

ब्रिटेनची महाराणी एलिझाबेथची लाडकी सून प्रिन्सेस डायनाला होता त्वचेचा 'हा' भयंकर आजार, असा होता दिनक्रम

Princess Diana Was Suffering From Rosacea : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांची सून प्रिन्सेस डायना राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती होती. केवळ ब्रिटनमध्येच नाही तर जगभरातील लोकांनी त्यांना खूप पसंत केले. त्यांच्या निधनाला 25 वर्षे झाली तरी लोक त्यांची आठवण काढतात. पण तिच्या नितळ त्वचेची चर्चा नेहमीच सर्वत्र होत असते. नितळ त्वचेचे रहस्य सर्वांसमोर आले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की प्रिन्सेस डायना त्वचेच्या एका आजाराने ग्रस्त होती.

Authored byमृणाल पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2022, 9:34 pm
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांची सून प्रिन्सेस डायना राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती होती. केवळ ब्रिटनमध्येच नाही तर जगभरातील लोकांनी त्यांना खूप पसंत केले. त्यांच्या निधनाला 25 वर्षे झाली तरी लोक त्यांची आठवण काढतात. पण तिच्या नितळ त्वचेची चर्चा नेहमीच सर्वत्र होत असते. नितळ त्वचेचे रहस्य सर्वांसमोर आले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की प्रिन्सेस डायना त्वचेच्या एका आजाराने ग्रस्त होती. यामुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्समुळे चेहऱ्यावर सूज आणि छोटे पिंपल्स राहणे या गोष्टी होत होत्या. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या सुंदर त्वचेने सर्वांचे मन मोहणाऱ्या प्रिन्सेस डायनाला नक्की कोणता आजार होता. हा आजार कसा असते. त्या आजाराबद्द्ल सर्व काही जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम did you know princess diana suffered fromrosacea skin disease
ब्रिटेनची महाराणी एलिझाबेथची लाडकी सून प्रिन्सेस डायनाला होता त्वचेचा 'हा' भयंकर आजार, असा होता दिनक्रम



​त्वचेच्या समस्येने त्रस्त होते

तथापि, तुम्हाला माहित आहे का की राजकुमारी डायना देखील त्वचेच्या आजाराशी झुंज देत होती? रोसेसिया या आजाराने त्या त्रस्त होत्या. यामध्ये त्वचा लाल होते आणि लहान मुरुम देखील दिसतात.

( वाचा :- वयाच्या 40 व्या वर्षीही पंचविशीतील वाटाल, बाबा रामदेव सांगितले हेल्दी त्वचेचे रहस्य)

​रोसेसिया म्हणजे काय

ही एक त्वचेची स्थिती आहे जी बऱ्याच काळासाठी त्रास देते, विशेषतः चेहऱ्यावर पिंपल्समुळे सूज आणि छोटे पिंपल्स राहतात. त्यामुळे त्वचा खराब होते.

(वाचा :- कारल्याचा रस चेहऱ्याला लावून पाहा, जाणून घ्या या कडू कारल्याचे औषधी फायदे)

​प्रिन्सेस डायनाने ही परिस्थिती अशी हाताळली?

प्रिन्सेस डायना बऱ्याच काळापासून रोसेसियाशी झुंज देत होत्या, या काळात त्यांनी सौंदर्य उत्पादने हुशारीने वापरायच्या त्यामुळे त्यांना खूप कमी त्रास व्हायचा.

(वाचा :- पचनशक्ती बरोबरच ताकाचे आहेत अनेक बहुगुणी फायदे, त्वचा व केसांसाठी तर जणू अमृतच)

​त्वचेची विशेष काळजी घेतली

डायना आपल्या त्वचेबाबत खूप जागरूक होत्या. तिची मेकअप आर्टिस्ट मेरी ग्रीनवेलने सांगितले होते की, त्या नेहमी झोपण्यापूर्वी मेकअप काढायच्या, चेहरा स्वच्छ करायच्या. तसेच मेकअप करण्यापूर्वी ती चेहरा स्वच्छ करायची. हा त्यांच्या नित्याच्या दिनक्रम होता.

(वाचा :- या 7 गोष्टी त्वचेसाठी ठरतील 'घातक विष', या गोष्टी लगेच खाणे बंद करा)

​हा होता डायना स्किन केअर रूटीन

ग्रीनवेलच्या म्हणण्यानुसार, प्रिन्सेस डायनाने दिवसातून दोनदा क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करायच्या सीरमसोबत सनब्लॉक वापरायला त्या विसरायच्या नाहीत. त्वचा जास्ती जास्त नॅचरल कशी ठेवता येईल या गोष्टीचा त्या विचार करायच्या.

(वाचा :- दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितला रामबाण उपाय, एका आठवड्यात थांबेल केस गळणं)

लेखकाबद्दल
मृणाल पाटील
"मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. "... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज