अ‍ॅपशहर

या १० कारणांनी डोळ्यांखाली येतात डार्क सर्कल्स, हे सोपे घरगुती उपाय करतील समस्येचा नाश

What Is The Reason Behind Dark Circle : अनेकांच्या डोळ्याखाली डार्क सर्कल निर्माण होतात. आपल्या आयुष्यातील 10 कारणांमुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती कारणे.

Authored byमृणाल पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2022, 5:34 pm
डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होणं ही मोठी सौंदर्य समस्या आहे. ही का तयार होतात हे समजून न घेता त्यावर फक्त कॉस्मेटिक उपाय केले जातात. पण यामुळे डार्क सर्कलची समस्या सुटत नाही उलट ती आणखीनच तीव्र होते. डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण होण्यास एखादं विशिष्ट कारणच कारणीभूत असतं असं नाही तर अनेक कारणं डार्क सर्कलची समस्या निर्माण करतात. यातील बरीचशी कारणं ही जीवनशैली निगडित असतात. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to get rid of dark circles easy home remedies
या १० कारणांनी डोळ्यांखाली येतात डार्क सर्कल्स, हे सोपे घरगुती उपाय करतील समस्येचा नाश


डोळ्यांखाली डार्क सर्कल

अनेकांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल येण्यामागे अनुवांशिकता हे कारण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीत हे डाग पूर्णपणे घालवणं अवघड होतं. अनुवांशिकता हे कारण असल्यास ही काळी वर्तुळं थोडी पुसट करता येतात पण पूर्णपणे घालवता येत नाही.

लॅपटॉपचा वापर

लॅपटॉप टीव्ही, मोबाइल जास्त बघणं ही सवय डार्क सर्कलसाठी कारणीभूत ठरते. स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्यानं डोळ्यांवर ताण येतो. त्याचा परिणाम म्हणूनही डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. त्यामुळे जर तुम्ही सतत स्क्रीनसमोर असाल तर त्याचा वेळ कमी करा.

​झोप पूर्ण न होणं

झोप पूर्ण न होणं, थकवा यामुळे डार्क सर्कल येतात. साधारणत: 7-8 तासांची झोप आवश्यक असते. पण काम, डिजीटल साधनं हाताळण्यात जाणारा वेळ यामुळे झोपेकडे दुर्लक्ष होतं. तुमची झोप पूर्ण करा यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून देखील दुर राहाल.

​मेकअपची अती केल्यामुळे देखील

अनेक कॉस्मेटिक्स असे असतात ज्यामुळे त्वचेला ॲलर्जी होते आणि नंतर त्यामुळे डार्क सर्कल्स पडतात. तसेच डोळ्यांना केलेला मेकअप चुकीच्या पध्दतीनं पुसणं हे डार्क सर्कल होण्यास कारणीभूत ठरतं.

सनस्क्रीन लोशन

सनस्क्रीनमुळे लोशनचा त्वचेच सूर्याच्या अती नील किरणांपासून संरक्षण होतं. हेच सनस्कीन डोळ्यांखालील नाजूक त्वचेचं संरक्षण करण्यासाठीही महत्वाचं असतं. पण सनस्क्रीन वापरण्यास टाळाटाळ केल्यास डोळ्याखालील त्वचेचं संरक्षण होत नाही आणि काळी वर्तुळं पडतात.

​गरम पाण्याने चेहरा धुणे

गरम पाण्यानं चेहेरा धुण्याची सवय त्वचेसाठी घातक असते. गरम पाण्यानं चेहेरा धुताना तेवढ्यापुरती छान वाटतं. पण त्यामुळे त्वचा खराब होते. त्वचेचा पोत बिघडतो. त्यामुळे चेहरा थंडपाण्याने धुवा.

मिठाचं प्रमाण

आहारात मिठाचं प्रमाण जास्त असल्यास शरीरातील पेशी पाणी धरुन ठेवतात. यामुळे डोळ्याखालील त्वचा अधिकच पातळ होते आणि काळी पडते.

धूम्रपानाची सवय

धूम्रपानाची सवय असल्यास कोलॅजन निर्मितीस अडथळा येतो, त्यामुळे त्वचा काळी पडते, खराब होते. त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेखालील रक्तप्रवाह बिघडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात. त्यामुळे धूम्रपानाची समस्या कमी करा. (वाचा :- चेहऱ्यावरील केसांमुळे त्रस्त आहात ? मग हे काम करा वेदनाशिवाय मिळेल आराम, करीना कपूर देखील वापरते हा जालिम उपाय)

आजारपण

आजारपणामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात. आजारपणात नीट जेवण जात नाही. त्यामुळे शरीरास पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम शरीर अशक्त होतं. चेहेरा काळवंडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होतात. (वाचा :- Hair Growth Tips: नखांना नखं घासल्याने खरंच केस वाढतात का ? जाणून घ्या खरं उत्तर , या लोकांनी हा उपाय टाळाच)

​एलोवेरा

  • एलोवेरा लावल्याने पिगमेंटेशन कमी होऊन कोलेजन वाढण्यास मदत होते. तसेच यामुळे ‘विटामिन ई’ची कमतरता भरून निघते, त्यामुळे डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवण्यासाठी एलोवेरा फायदेशीर मानले जाते.
  • थंड दूधही पिगमेंटेशन कमी करून कोलेजन वाढण्यासाठी कायदेशीर मानले जाते. यासाठी कापसाचा बोळा थंड दुधात बुडवून तो चेहऱ्यावर लावावा.

(वाचा :- मुरुमांसाठी गर्भनिरोधक गोळ्या खाणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचे मत)

लेखकाबद्दल
मृणाल पाटील
"मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. "... आणखी वाचा

महत्वाचे लेख