अ‍ॅपशहर

Skin Care : गुलाबी थंडीत त्वचा, आरोग्य आणि केस राहतील एकदम ओके, आहारतज्ज्ञांनी सांगितले खास उपाय

Skin Care in winter : सध्या वातावरणामध्ये गारवा वाढला आहे. या गुलाबी थंडीचा थेट परिणाम त्वचेवर आणि केसांवर होत असतो. ऋजुता दिवेकर यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

Authored byमृणाल पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2023, 9:24 pm
वातावरणातील बदलाचा थेट परिणाम त्वचा आणि केसांवर होत असतो. सध्या वातावरणात गारवा वाढला आहे. या थंड वातावरणाचा गंभीर परिणाम त्वचेवर दिसू येतो. याकाळात त्वचा रुक्ष, निस्तेज होते. असे असताना घरात असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करुन तुम्ही नितळ त्वचा मिळवू शकता. सेलिब्रिटी न्युट्रिशियन ऋजुता दिवेकर यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्स फॉलो करुन थंडीपासून तुम्ही तुमच्या त्वचेचे रक्षण करु शकता. (फोटो सौजन्य - Istock, @rujuta.diwekar)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to take care of health skin and hair in winter tips given by rujuta divekar
Skin Care : गुलाबी थंडीत त्वचा, आरोग्य आणि केस राहतील एकदम ओके, आहारतज्ज्ञांनी सांगितले खास उपाय


आवळ्याचा वापर

थंडीच्या दिवसात आवळ्याचं सरबत किंवा च्यवनप्राश देखील खूप फायद्याचे ठरते. या दिवसांत आवळे भरपूर प्रमाणात मिळतात. त्यात व्हिटॅमिन सी सोबतच इतरही अनेक महत्त्वाची खनिजे असतात. आवळ्यामुळे केस वाढतात.
(वाचा :- :- 1 रूपयाही खर्च न करता कांद्याच्या सालीपासून घरीच बनवा डाय, पांढरे केस नैसर्गिकरित्या होतील काळेभोर)

ऋजुता दिवेकर यांनी दिल्या टिप्स

View this post on Instagram A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

मेथीचा वापर

दुसरा रामबाण उपाय म्हणजे मेथी हिवाळा सुरू झाला की घरोघरी डिंक, मेथी, सुकामेवा घालून लाडू केले जातात. हे लाडू देखील नियमितपणे खा. हे लाडू तुमच्या त्वचेला उजळवून टाकतील. त्यामुळे दिवसातून एकदा तरी मेथीच्या लाडूचे सेवन करा.
(वाचा :- सौंदर्यात सर्वांना टक्कर देते अथिया शेट्टी, हे आहे साऊथ इंडियन ब्युटीचे स्किन रुटीन)

हिवाळ्यात कशी घ्यायची केसांची- त्वचेची काळजी

ऋजुता सांगतात की थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्या, फळे खाण्यावर भर द्या. यामुळे तुमच्या आहारात जास्ती जास्त फळांचा समावेश करा.

मोहरीच्या तेलाचा वापर

थंडीच्या दिवसात मोहरीचे तेल देखील फायदेशीर ठरते. यासाठी मोहरीच्या तेलामध्ये मेथीदाणे भिजत घाला आणि या तेलाने डोक्याला मालिश करा. या तेलाने तुम्ही अंगाला मालिश करु शकता. यामुळे तुमचे केस आणि त्वचा सुंदर होण्यास मदत होईल.
(वाचा :- वयाच्या 40 नंतर शिल्पा शेट्टी त्वचेची अशी घेते काळजी)
लेखकाबद्दल
मृणाल पाटील
"मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. "... आणखी वाचा

महत्वाचे लेख