नेलआर्ट
यावेळी अक्षयाने तिच्या नेलआर्टमध्ये तिच्या लग्नाची तारीख आणि त्या दोघांचे नावाचे पहिले अक्षर म्हणजेच 'अहा' असे लिहले आहे. तिच्या नेलआर्टची ही डिझाईन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मेहंदीची डिझाईन
अक्षयाने तिच्या मेहंदी कार्यक्रमाचे काही व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. तिने या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. शिवाय तिची मेहंदीही अगदी आकर्षक आहे. वधू, प्रपोज करतानाचं एक जोडपं व सप्तपदी अशी तिच्या मेहंदीची डिझाइन आहे.
मेकअप
यावेळी अक्षराने कलरफुल रंगाचा स्कर्ट परिधान केला होत तर यावर तिने जांभळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. या कलरफुल ड्रेसमध्ये अक्षरा खूपच सुंदर दिसत होती. तर मेकअप बद्दल सांगायच झालं तर यावेळी तिने पिंक लिपस्टिक लावून तिचा लूक पूर्ण केला. अक्षराच्या चेहऱ्यावर नव्या नवरीची लाली स्पष्टपणे दिसत आहे. (वाचा :- मुरुमांसाठी गर्भनिरोधक गोळ्या खाणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचे मत)
नेलआर्ट करताना हा विचार करा
नेलआर्ट करताना तुमच्या नखांवर कोणता रंग उठून दिसतो? याबद्दल जाणून घ्या. सध्या नखं रंगीबेरंगी करण्याचा ट्रेंड सुरु आहे. त्याच प्रमाणे तुम्ही नखांवर वेगवेगळ्या नक्षी देखील काढू शकता. (वाचा :- या १० कारणांनी डोळ्यांखाली येतात डार्क सर्कल्स, हे सोपे घरगुती उपाय करतील समस्येचा नाश)
घरी नेलआर्ट करत असाल तर या गोष्टी लक्षात घ्या
- तुम्हाला नखांना कोणते पाच रंग द्यायचे आहेत ते निवडा. नेलपॉलिशच्या विविध रंग छटा वापरून प्रयोग करा.
- - तुम्ही पेस्टल, मेटॅलिक शेड किंवा निऑन रंगाचं नेलपॉलिश लावू शकता.
- - तुम्हाला आवडणाऱ्या आकारातील कँडीजच्या डिझाइन्स नखांवर साकारा.
- - नखांना चमक येण्यासाठी लास्ट टच द्या.
- - नेलपॉलिश लावण्याआधी बेस कोटचा वापर करा.
- - प्रत्येक नखाला वेगवेगळ्या रंगाचं नेलपॉलिश लावा.
(वाचा :- Skin Infection : हिवाळ्यात 'या' चुकीच्या सवयींमुळे त्वचा सोलली जाते, असू शकतात गंभीर आजार)