कढीपत्ता आणि तेल
- केस काळे करण्यासाठी एक कप कढीपत्ता घ्या आणि ते काळे होईपर्यंत उकळा.
- उकळल्यानंतर ते थंड होऊ द्या आणि नंतर त्यात तेल घाला.
- हे तेल केसांना लावून ठेवा काही काळाने तुम्हाला काळेभोर केस मिळण्यास मदत होईल. (वाचा :- Beauty tips : हट्टी Blackhead ला 'या' उपायांनी मुळासकट काढून टाका, चमकदार त्वचेसाठी एकदा नक्की वापरा)
केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय
यासाठी ६ ते ७ आवळे घ्यावे लागतील. त्यामध्ये तीन ते चार चमचे नारळ आणि बदामाचे तेल मिक्स करा
हे सर्व मिश्रण २० ते ३० मिनिटे उकळवा. उकळल्यानंतर ते थंड करा. या मिश्रणामध्ये एक चमचा मेथी पावडर टाका हे तयार झालेले मिश्रण केसांच्या मुळांमध्ये लावा. ते केसांना लावून झोपा आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा. यामुळे केस काळे होण्यास मदत होईल.
(वाचा :- क्रांती रेडकरने शेअर केला Hydra Facial चा व्हिडीओ, जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार)
लिंबाचा रस आणि बदाम तेल
- लिंबाचा रस आणि बदाम तेल हा उपाय करताना केसांच्या आवश्यकतेनुसार बदामाचे तेल घ्या.
- बदामाच्या तेलात लिंबाचा रस मिसळाते मिश्रण तयार झाल्यानंतर केसांना लावा आणि मसाज करा आणि सुमारे 30 मिनिटांनी केस स्वच्छ करा. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)