अ‍ॅपशहर

मुलांना झोपण्यापूर्वी अजिबात देऊ नका 'हे' पदार्थ, नाहीतर होतील निशाचर; रात्रभर तळमळत राहतील

Foods Affect Kids Sleep : लहान मुलांना जागे आहेत तोपर्यंत काही ना काही खाण्याची सवय असते. काही मुलांना रात्री जेवल्यानंतरही काही ना काही खायची सवय असते. अशावेळी तुम्ही मुलांना काही खास पदार्थ खायला दिले तर ही मुलं अगदी निशाचर सारखी रात्रभर जागी राहतात. या आर्टिकलमध्ये जाणून घ्या मुलांना कोणता पदार्थ खायला देऊ नका.

Authored byदक्षता समीर घोसाळकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 10:55 am
What foods make toddlers sleepy : मुलांचच नाही तर काही घरांचं शेड्युल अतिशय विचित्र असतं. रात्री उशिराने झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे, असा त्यांचा एक शेड्युल असतो. तर काही मुलांना रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. तसेच सकाळी उठल्यावर देखील ही मुलं अजिबात फ्रेश वाटत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 foods children should avoid before bed its affect sleep
मुलांना झोपण्यापूर्वी अजिबात देऊ नका 'हे' पदार्थ, नाहीतर होतील निशाचर; रात्रभर तळमळत राहतील


यामुळे या मुलांचा संपूर्ण दिवस खराब जातो. एवढंच काय तर अगदी शाळेत शिक्षणाकडे देखील या मुलांच लक्ष नसतं. मुलांच्या अशा तक्रारीपासून वाचवण्याकरता त्यांच्या डाएटकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. रात्री मुलं असे काही पदार्थ खातात ज्याचा परिणाम थेट त्यांच्या झोपेवर होत असतो. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)

​कॅफीन

कॅफीन झोप मारण्याचं काम करतं. कॅफीन मानवी शरीरात अनेक तास राहते. संध्याकाळी एक कप कॉफी प्यायल्यामुळे रात्रीची चांगली झोप येत नाही. कॉफी, चॉकलेट, ग्रॅनलो बार, एनर्जी ड्रिंक, सोडा आणि चहा यामध्ये कॅफीनचं प्रमाण असतं. रात्री झोपण्यापू्र्वी जवळपास ८ तास या पदार्थांपासून लांब राहा. कारण याचं सेवन केल्यामुळे रात्री चांगली झोप लागत नाही.

(वाचा - ब्रेस्टफिडिंग करताना माता करतात या चुका; यामुळे बाळांना मिळत नाही संपूर्ण दूध तर आईला होतो छातीत त्रास)

​चीज

मुलांना सँडविच किंवा पास्तामध्ये चीझ घालून खायला अतिशय आवडतं. तसेच शिळेपदार्थ झोपण्यापूर्वी अजिबात खाऊ नका. यामध्ये टायरामिन असा पदार्थ असतो. हे रसायन मेंदूला उत्तेजन देते, ज्यामुळे मेंदू एलर्ट आणि जागृत राहतो. पेपरोनी, नट, एवोकॅडो, सोया सॉस, रास्पबेरी आणि रेड वाईनमध्ये टायरामाइन असते.)

(वाचा - मुलांच्या 'या' सवयीमुळे पालकांची वाढते डोकेदुखी; 4 ट्रिक्स करतील पालकांना मदत) )

​भाज्या

काही भाज्या रात्रीच्या जेवणापेक्षा दुपारच्या जेवणात खाल्ल्या तर अधिक फायदेशीर असतात. कोबी, ब्रोकोली, पालक, कोबी, मुळा यांसारख्या क्रूसीफेरस भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे या भाज्या रात्री खाऊ नये. उच्च-कॅलरी अन्न पचवण्यासाठी शरीराचे तापमान वाढते, तर चांगल्या झोपेसाठी थंड तापमान आवश्यक असते. यामुळे मुलांच्या झोपेचा त्रास होतो.

(वाचा - Friendship Day : सिंगल मदर मुलीची का असते बेस्ट फ्रेंड; अभिनेत्री शुभांगी गोखले देतायत खास टिप्स)

​चटपटीत आणि मसालेदार पदार्थ

जास्त मसालेदार अन्न घेतल्याने मुलांमध्ये पचनाच्या समस्या निर्माण होतात. तसेच चटपटीत आणि मसालेदार पदार्थ खाल्यामुळे त्रास होतो. या पदार्थामुळे अपचन किंवा अतिसार, पाठदुखी यामुळे मुलाची झोप खराब होऊ शकते.

(वाचा - गर्भाशयाला 'हा' आजार झाल्यास स्त्री कधीच होऊ शकत नाही 'आई'; उपचार करूनही वंध्यत्व कायम)

गोड पदार्थ

जास्त साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मिष्टान्न, सोडा आणि कँडी यासारख्या साखरेचे पदार्थ आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. जेव्हा ते काही तासांनंतर शरीरात विरघळतात तेव्हा आपल्या शरीराला त्यांच्यावर अधिक काम करावे लागते. हे एड्रेनल कॉर्टिसॉल सोडते जे झोपेत अडथळा आणू शकते आणि बाळ रात्री जागे करू शकते.

(वाचा - चुका करण्यात तरबेज झालंय मुलं? पालकांनो आताच सतर्क व्हा, नाही तर खडतर होईल मुलाचं भविष्य)

​जड पदार्थ

रात्रीचे जेवणे हे हलके असावे याचं मुख्य कारण ते पचायला सोपे होते आणि यामुळे रात्री चांगली झोप लागते. वाढत्या मुलांनी पोट भरून खाणे चांगले आहे परंतु रात्री नाही. रात्री उशिरा चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणाचा धोका वाढतो. जेवताना झोप लागल्याने छातीत जळजळ आणि ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतात. ज्यामुळे झोप देखील खराब होते.

कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनात 7 वाजल्यानंतर खाऊ घातलेल्या उंदरांची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता कमी झाल्याचे दिसून आले. रात्री उशिरा खाल्ल्याने उंदरांची स्मरणशक्ती कमी होते. यामुळे मुलांच्या देखील स्मरणशक्तीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.

(वाचा - गरोदरपणात रडणे किंवा डिप्रेस होणे याचा गर्भातील बाळावर थेट काय परिणाम होतो? बाळामध्ये दिसून येतात ही लक्षणे) )

लेखकाबद्दल
दक्षता समीर घोसाळकर
"दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 11 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख