अ‍ॅपशहर

पाऊस आला रे…

पाऊस प्रत्येकाच्या मनातला. दुष्काळामुळे यंदा पावसाची अधिकच आस लागून राहिली होती. आता तर तो आलाय. बच्चेकंपनीला या पावसाबद्दल, बरसातीबद्दल काय वाटते, ते त्यांच्याच शब्दांत.

Maharashtra Times 25 Jun 2016, 12:56 am
पाऊस प्रत्येकाच्या मनातला. दुष्काळामुळे यंदा पावसाची अधिकच आस लागून राहिली होती. आता तर तो आलाय. बच्चेकंपनीला या पावसाबद्दल, बरसातीबद्दल काय वाटते, ते त्यांच्याच शब्दांत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kids sharing their rain memories
पाऊस आला रे…


भजी आणि मॅगी

पाऊस आला रे आला की मातीचा गंध येतो. तो वास मनात भरून घेत असतानाच घरातील स्वयंपाकघरातून एक नवा वास येऊ लागतो… तो म्हणजे आईच्या हातच्या भजीचा. माझी आई इतकी छान भजी करते की बस्स… कधी कधी मला पावसात मॅगी खायलाही खूप आवडते.

- अद्वैत राशिनकर, पवई

भिजण्याचा आनंद…

यंदा पावसाची सगळ्यांनाच फार उत्सुकता होती. कधी एकदा तो येतो आणि आम्ही त्याचे स्वागत करतो, असे झाले होते. अखेर तो आला नि आम्हा सगळ्यांना चिंब भिजवू लागला. पाऊस आणि चिंब भिजण्याचा आनंदच निराळा

- अन्वयी कोरडे, बोरीवली

माझिया मना..

पाऊस आला की मनसोक्त कविता, गाणी, संगीत यांचा आनंद घ्यायला मिळतो. सृष्टी हिरवा रंग ल्यायलेली असते. मन प्रफुल्लित होते. ताजेतवाने होते. धबधब्याखाली मनसोक्त भिजायचे. टपरीवर चहा प्यायचा. मॅगी खायची. भरपूर भटकंती करायची आणि मन ताजतवानं करायचं

- अमित मोरे, वसई

दोन थेंब आनंदाचे

शेतकऱ्यांपासून ते बच्चेकंपनीपर्यंत सगळ्यांना आपला वाटणारा, आनंद देणारा पाऊस. तो आला आणि मन उल्हसित करून गेला. पहिल्याच पावसात आम्ही मित्रमंडळी मनसोक्त भिजलो. भरपूर भजी खाल्ली. पाणीपुरी खाल्ली. कधी नव्हे ते आम्हाला चहाही मिळाला. पाऊस खरंच आनंद घेऊन आलाय.

- योगेश सूर्यवंशी, दादर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज