अ‍ॅपशहर

जलसफर

उन्हाळ्यामध्ये घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळा जीव नकोसा करतात. त्यातच मुलांना शाळेला सुट्टी असल्याने घरातच जखडून रहावे लागते. पण, या उन्हाळ्य ात थंडावा आणि आनंद असे दुहेरी साध्य झाले तर? चला तर बच्चेकंपनी यंदाच्या सुट्टीत करा जलसफर… मुंबई आणि परिसराला लाभलेल्या समुद्राची सफर तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जाईल.

Maharashtra Times 16 Apr 2016, 9:45 am
उन्हाळ्यामध्ये घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळा जीव नकोसा करतात. त्यातच मुलांना शाळेला सुट्टी असल्याने घरातच जखडून रहावे लागते. पण, या उन्हाळ्य ात थंडावा आणि आनंद असे दुहेरी साध्य झाले तर? चला तर बच्चेकंपनी यंदाच्या सुट्टीत करा जलसफर… मुंबई आणि परिसराला लाभलेल्या समुद्राची सफर तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जाईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai safari
जलसफर


मनोरी फेरी मालाडच्या मार्वे बीचपासून सुरू झालेली तुमची ही सफर तुम्हाला थेट मनोरीच्या सुंदर किनाऱ्यावर नेऊन सोडेल. स्वतःची दुचाकी घेऊन तुम्ही इथे आला, तर ती सुद्धा तुम्हाला या बोटीतून पलिकडच्या किनाऱ्याला नेता येईल. मनोरीच्या किनाऱ्याला पाऊल ठेवलं की, एका वेगळ्याच विश्वात पोहोचल्याचा अनुभव तुम्हाला इथे येईल. एखाद्या सिनेमाच्या लोकेशन वाटावे, असा नितळ सुंदर किनारा, किनाऱ्याला लागून असलेली हॉटेल्स आणि टुमदार बंगले सहज नजरेस पडतील. गेटवे ऑफ इंडिया ही फेरी बोट अवघ्या पाऊण तासात तुम्हाला अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मांडव्याच्या किनाऱ्यापर्यंत नेईल. तर दुसरी फेरी बोट तुम्हाला तासाभरात एलिफन्टा (घारापुरी) बेटावर नेईल. बोटीने किनारा सोडताच गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल यांचे मनोरम्य दृश्य तुमच्या समोर उभे राहते. एलिफन्टाला जाताना तुम्हाला बचलर बेट सुद्धा पाहायला मिळेल. सागरी मार्गाने मुंबईत येणारे सर्व ऑइल कंटेनर इथे रिकामे होतात आणि हे तेल पुढे मुंबईमध्ये आणले जाते. तर मांडव्याचा किनारा हा पूर्वीपासून त्याच्या सुंदर सागरी किनाऱ्यासाठी आणि अमिताभ बच्चनच्या 'अग्निपथ (१९९०)' सिनेमामुळे प्रसिद्ध आहे. भाऊचा धक्का, माझगाव इथून निघालेली फेरीबोट रेवस वा मोराच्या किनाऱ्याला जाते. रेवस हे अलिबागपासून दहा किमी अंतरावर वसलेले गाव तर मोरा हे उरण नजिकचं बंदर. रेवसला जाताना तुम्हाला अलिबागचा सुंदर किनारा तर पाहायला मिळेलच. पण खांदेरी, उंदेरी ही बेटे आणि कोरलाई किल्ला सुद्धा पाहता येईल. वर्सोवा ही फेरीबोट तुम्हाला अगदी पाच मिनिटांत वर्सोव्याहून थेट मढ आयलंडला घेऊन जाईल. ही बोटसेवा मुंबई शहरात मासळी विकण्यासाठी येताना वापरतात. सकाळी पाच वाजता पहिली बोट निघते तर शेवटची दुपारी दीडला. अर्नाळा, विरार एका छोट्याशा बेटावर वसलेल्या अर्नाळा किल्ल्यावर ही फेरीबोट तुम्हाला सहज घेऊन जाते. एक छोटंसं गाव, सुंदर किनारा, एक क्लॉक टॉवर आणि रिसॉर्ट असे सारे काही इथे आहे. इथे सध्या वापरत असलेल्या जेट्टी अजून उपलब्ध नसल्याने ढोपरभर पाण्यात जाऊन बोटीमध्ये चढता येईल. एकदा तुम्ही पलीकडे पोचलात की अर्नाळा किल्ल्याला भेट देता येईल. नायगाव वसई जवळच्या पाणजू बेटावर ही बोट तुम्हाला घेऊन जाईल. वसईच्या खाडीच्या मुखामध्ये असलेल्या या बेटावर ही बोट तुम्हाला अवघ्या पाच मिनिटांत सोडेल. - दीपेश वेदक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज