अ‍ॅपशहर

तुमचं मुलं देखील शाळेत जाण्यास नकार देतं? पालकांनी करावी ही काम, मुलाच्या मनातील भीती होईल दूर

What to Do When Your Child Hates School : करोनाच्या दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर आता शाळा सुरू झाल्यात. काही मुलांना शाळेचं प्रचंड आकर्षण आहे. पण काही मुलं मात्र शाळेत जाताना खूप रडतात. शाळा म्हटलं की, त्यांनी भोंगा पसरलाच समजा. अशावेळी मुलांची मनःस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे.

Authored byदक्षता समीर घोसाळकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2022, 2:48 pm
शाळा सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आहे. तरी काही मुलं शाळेच्या या वातावरणात अजिबात मिसळलेली नाहीत. शाळा म्हटलं की आजही ही मुलं रडणं सुरू करतात. मुलांच हे असं वागणं पालकांसाठी अतिशय त्रासदायक असतं. नेमकं शाळेतं जाणं का टाळलं जात आहे हे समजणं कठीण होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parenting tips for kids who hates going to school
तुमचं मुलं देखील शाळेत जाण्यास नकार देतं? पालकांनी करावी ही काम, मुलाच्या मनातील भीती होईल दूर


पालकही मुलांच्या अशा वागण्याला बळी पडतात आणि मुलांना घरीच ठेवून घेतात. अनेक वेळा, पालक मुलाला आळशी किंवा खोडकर समजतात आणि त्याला जबरदस्तीने शाळेत पाठवतात, परंतु यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते. मूल हट्टी आणि चिडखोर बनते आणि शाळेत जाण्यास आणखी संकोच करते. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)

​मुलं शाळेत जाण्यापासून का घाबरतात?

पालकांनी मुलांच्या शाळेत न जाण्याच्या हट्टाकडे गांभीर्याने पाहायला हवं. कारण शाळेत न जाण्या मागचं कारण मुलांकडून जाणून घेणं गरजेचं असतं. कारण मुलांना मोकळं किंवा बोलतं केल्याशिवाय त्यांच्या मनातील भावना कळणार नाही. शाळा ही मुलांच भवितव्य ठरवत असते. अशावेळी शाळेपासून दूर जाण्याचा विचार मुलांच्या मनात का येतोय हे पाहणं गरजेचं आहे.

(वाचा - Kids Health Tips : पोटातील जंतामुळे मुलं झालीत हैराण? आहारात करा या ६ पदार्थांचा समावेश, होईल मुळापासून नाश

​अनेक कारणांमुळे मुलं करतात शाळेचा द्वेष

शाळेत जाताना रडण्यामागचं कारण मुलं वर्गात रुळलेली नसतात. तर काही मुलं वर्गातील इतर मुलांना घाबरत असतात, त्यामुळे त्यांना शाळेत नसतं जायचं. मुलांना शाळेत अनेकदा असे अनुभव येतात ज्यामुळे त्यांच्या मनात शाळेबद्दल भीती निर्माण होते. तसेच काही मुलांना शिक्षणाची भीती असते. शिकवलेलं काही कळत नसतं. त्यामुळे त्यांना भीती वाटत असते. तर काही मुलांना पालकांपासून दूर जाण्याची भीती वाटते त्यामुळे ते रडतात.

(वाचा - Food For Sperm Count : लो स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी ५ पदार्थ ठरतात अधिक फायदेशीर)

​मुलांच्या समस्येचं कारण समजून घ्या

मुलाची ही भीती काढण्याचा पहिला प्रयत्न करा. नक्की शाळेत न जाण्या मागचं कारण काय हे समजून घेणं गरजेचं असतं. तसेच शिक्षकांशी बोलून तुमच्या मुलाचं शाळेत वर्तन कसं आहे? हे देखील समजून घ्या. वर्गातील इतर मुलं तुमच्या मुलाशी कसे वागतात? हे देखील समजून घेणं गरजेचं आहे.

(वाचा - Parenting Single Child: एकच अपत्य असणाऱ्या मुलांच्या संगोपनाबाबतचे ५ गैरसमज, तुम्हाला देखील एकचं मुलं आहे?)

​मुलांवर दबाव आणू नका

मुलांना ओरडून, दम देऊन शाळेत पाठवू नका. कारण अशा केल्यामुळे त्यांना अधिक भीती वाटू शकते. कारण मुलाने प्रेमाने आणि विश्वासाने शाळेत जाणं जास्त गरजेचं आहे. त्याच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून हे जास्त महत्वाचं आहे. कारण कोणत्याही समस्यांना सामोर जाण्यासाठी शाळाच बळ देत असते.

(वाचा - प्रेग्नेंसीमध्ये अजिबात करू नका ही ४ काम, प्रीमॅच्युअर डिलीवरीसोबत बाळासाठी मोठा धोका

​मुलांचे मित्र बना

मुलांना शाळेत पोहोचवण्याचे किंवा नेण्याचे काम स्वतः करा. मुलाला शिक्षक आणि वर्गातील इतर मित्रांसह समाजात मिसळण्यास मदत करा. मुलाने चूक केली तर त्याला शिव्या देण्याऐवजी ती चूक सुधारण्यास मदत करा. शाळेतून आल्यानंतर मुलांशी बोला आणि दिवसभरात काय केले आणि काय नाही हे त्यांना विचारा. मुलांना हे समजण्यास मदत करा की शाळा ही एक मजेदार जागा आहे आणि जर मुल नियमितपणे शाळेत जात असेल तर तो किंवा ती दररोज नवीन मित्र बनवू शकेल आणि बरेच काही शिकू शकेल.

(वाचा - Worst Food For Kids Teeth : मुलांच्या दातांसाठी हे ५ पदार्थ हानिकारक, पदार्थांवर मारा फुल्ली) )

लेखकाबद्दल
दक्षता समीर घोसाळकर
"दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 11 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख