अ‍ॅपशहर

ती जिवंत राहील की नाही.... प्रियंकाने पहिल्यांदाच सांगितली मालतीच्या जन्माची गोष्ट

Priyanka Chopra on Surrogacy : प्रियंका चोप्रा आणि मालतीचं Vogue मॅगझिनसाठी फोटोशूट केलं आहे. या फोटोने सगळ्यांच लक्ष वेधलं आहे. पण या फोटोतही प्रियंकाने बाळाचा चेहरा दाखवला नाही.

Authored byदक्षता समीर घोसाळकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2023, 3:45 pm
प्रियंका चोप्रा आणि निक जोनसची मुलगी मालती मेरी एक वर्षांची झाली आहे. मात्र अद्याप तिचा गोंडस चेहरा दाखवण्यात आला नाही. मालती आणि प्रियंकाचं Vogue मॅगझिन करता फोटोशूट करण्यात आलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम priyanka chopra shared beautiful picture with baby malti marie and surrogacy experince
ती जिवंत राहील की नाही.... प्रियंकाने पहिल्यांदाच सांगितली मालतीच्या जन्माची गोष्ट


यानंतर पुन्हा एकदा मालतीच्या जन्माबाबत चर्चा झाली. प्रियंकाने स्वतः मालतीला जन्म न देता सरोगसीची मदत घेतली. यावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या. प्रियंकाने आपल्या कामामुळे गर्भधारणेचा निर्णय घेतला नाही. अशा एक ना अनेक चर्चांवर प्रियंकाने मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत उत्तरे दिली आहे. (फोटो सौजन्य - Priyanka Chopra इंस्टाग्राम / iStock)

मालती जगेल की नाही याबाबत शंका

प्रियंका चोप्राने वोग मगॅझिनला दिलेल्या मुलाखतीत मालतीच्या जन्माची गोष्ट सांगितली आहे. मालतीचा जन्म हा पूर्ण एका ट्रायमेस्टरच्या अगोदर झाला आहे. जेव्हा मालतीचा जन्म झाला तेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्येच होती, असं प्रियंका सांगते. मालती खूप छोटी होती, अगदी माझ्या हातापेक्षाही छोटी, असल्याचं प्रियंकाने सांगितले.

(वाचा - उंची, दिसणं एवढंच काय नोकरीही सारखीच.. तरीही दोघं एका आईची मुलं नाहीत, काय आहे हा चमत्कार)

यांच्यामुळे वाचली मालती

इंटेसिव केअर नर्सेस कसं करत होत्या ते प्रियंका आणि निक बघत होते. त्या देवाचं नाव घ्यायच्या आणि मालतीच्या शरीरात ट्यूब घालत होत्या. निक आणि मी दोघेही बघत होतो. आम्हाला कळतंच नव्हतं की, मालती जगेल की नाही.

(वाचा - पुण्यातील शिवन्या जन्माच्यावेळी अवघ्या ४०० ग्रॅमची, डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण पुढे जे घडलं तो एक चमत्कारच)

प्रियंका - मालतीचे खास क्षण

View this post on Instagram A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंका बाळाला जन्म देऊ शकत नव्हती

प्रियंकाने सांगितलं की, तिला काही मेडिकल प्रॉब्लेम होते. ज्यामुळे ती स्वतः बाळाला जन्म देऊ शकत नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेणं गरजेचं होतं. मी या सरोगसी पद्धतीची खूप आभारी आहे कारण या वैद्यकीय स्थितीमुळे आईपण अनुभवू शकली. तसेच आपल्याकरता सरोगसी करणाऱ्या व्यक्तीचे देखील आभार मानले आहेत. ती व्यक्ती खूप चांगली असून प्रेमळ आणि मजेशीर होती. सहा महिन्यांपर्यंत आमच्या बाळाची त्यांनी काळजी घेतली, याकरता आम्ही आभारी आहोत.

(वाचा - गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर))

मुलीचं नाव ठेवलं अतिशय युनिक

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने २०१८ मध्ये लग्न केलं. गेल्यावर्षी जानेवारीत त्यांनी बाळाच्या जन्माची माहिती दिली. प्रियंका कायमच मुलीची झलक दाखवते पण अद्याप चेहरा दाखवलेला नाही. प्रियंकाने आपल्या आई आणि निकच्या आईशी संबंधीत मुलीचं नाव ठेवलं आहे. प्रियंकाने लेकीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवलं आहे.

सरोगसी म्हणजे काय?

जेव्हा एखादी वैद्यकीय समस्या असते. घर्भधारणेत धोका असतो किंवा गर्भधारणेमुळे आईच्या आरोग्याला धोका असतो किंवा एकट्या व्यक्तीची पालक होण्याची इच्छा असते तेव्हा सरोगसीच्या मदतीने बाळाला जन्म देऊ शकतो. सरोगसीमध्ये, पुरुष जोडीदाराचे शुक्राणू आणि स्त्री जोडीदाराची अंडी फलित करून सरोगेट आईच्या गर्भाशयात ठेवली जातात. ही संपूर्ण प्रक्रिया भारतात कायदेशीररित्या वैध आहे.

(वाचा - ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या आईने अल्कोहोल पिणे योग्य? गायनोकॉलॉजिस्टने सांगितल्या वॉर्निंग टिप्स)

लेखकाबद्दल
दक्षता समीर घोसाळकर
"दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 11 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज