अ‍ॅपशहर

लग्नाच्या १८ वर्षांनंतर अपूर्व-शिल्पाने अनुभवलं पालकत्व, मुलीला दिलं ट्रेडिशनल आणि मीनिंगफुल नाव

Apurva Agnihotri Daughter Name : बॉलिवूड अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा सकलानी यांच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. या दाम्पत्यांनी तब्बल १८ वर्षांनी हे प्रेम अनुभवलं आहे. बाळाचा पहिला फोटो आणि नाव शेअर केलं आहे. जाणून घ्या नावाचा अतिशय युनिक अर्थ.

Authored byदक्षता समीर घोसाळकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2022, 12:00 pm
बॉलिवूड अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा सकलानी यांनी तब्बल १८ वर्षांनी पालकत्वाचा आनंद अनुभवला आहे. अपूर्व आणि शिल्पाने मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. यासोबत दोघांनी मुलीचं नाव देखील जाहीर केलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम unique baby girl name of apurva agnihotri and shilpa saklanis new born know meaning and other popular baby names
लग्नाच्या १८ वर्षांनंतर अपूर्व-शिल्पाने अनुभवलं पालकत्व, मुलीला दिलं ट्रेडिशनल आणि मीनिंगफुल नाव


टीव्ही अभिनेत्री शिल्पा सकलानी आणि अपूर्व अग्निहोत्रीने २००२ मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या १८ वर्षांनंतर त्यांच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. शिल्पा आणि अपूर्वने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून मुलीचा जन्म आणि नाव जाहीर केलं आहे. शिल्पा आणि अपूर्वने मुलीला दिलेलं नाव अतिशय गोंडस आहे. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)

​शिल्पा-अपूर्वच्या मुलीचं नाव

शिल्पा आणि अपूर्वने मुलीचं नाव ईशानी कनु अग्निहोत्री.(Ishaani Kanu Agnihotri) असं ठेवलं आहे. ईशानी हे मुलीचे नाव असून भारतीय वंशाचे नाव आहे. ज्याचा अर्थ "इच्छा" आहे. हे देवी दुर्गा किंवा पार्वतीला दिलेले नाव आहे. भगवान शिवाची पत्नी म्हणजे ईशानी. शक्तिशाली देवता, देवी दुर्गा भारतीय देवतांमध्ये मोठ्या प्रमाणात पूजली जाते. सामर्थ्य, संरक्षण, मातृत्व, युद्ध आणि विनाश यासह अनेक संघटनांसह तिला बहुआयामी मानले जाते. )

(वाचा - अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला जुळ्या मुलांचा फोटो, बाळांच्या हटके नावांनी सगळ्यांच लक्ष वेधलं))

​शिल्पा-अपूर्वच्या मुलीचा पहिला फोटो

शिल्पा-अपूर्वने मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी खूप छान कॅप्शन देखील लिहिलं आहे. तसेच त्यांचा आई-बाबा होण्याचा अनुभव किती खास आहे.

अपूर्वने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिलंय की, अशाप्रकारे हा बर्थडे माझ्या जीवनातील सर्वात चांगला आणि खास वाढदिवस आहे. कारण परमेश्वराने आशिर्वाद म्हणून सगळ्यात स्पेशन, अद्भुत आणि खूप किंमती गोष्ट लिहिली आहे.

(वाचा - 'ही' एक टेस्ट गरोदर राहण्यास करेल मदत, अनेक महिलांना झालाय याचा फायदा)

शिल्पा-अपूर्वची खास पोस्ट

View this post on Instagram A post shared by Apurva Agnihotri (@apurvaagnihotri02)

​२०२२ मधील लोकप्रिय नावे

आद्विक - मुलाकरता तुम्ही आद्विक या नावाचा विचार करू शकता. आद्विक या नावाचा अर्थ अनोखा असा आहे. आद्विक हे नाव अतिशय वेगळं आणि हटके आहे.

राहुल - राहुल हे अतिशय सदाबहार नाव आहे. राहुल हे नाव बुद्धचा मुलगा, सगळ्या दुःखांवर विजयी या अर्थाचं आहे.

(वाचा - इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच.... पाहा नावाचा अर्थ)

​रेयांश

तुम्ही मुलाचं नाव रेयांश असं देखील ठेवू शकता. रेयांश या नावाचा अर्थ आहे सूर्य, प्रकाशाचा पहिला किरण, विष्णुचा अंश असा आहे.

(वाचा - आताच्या मुलांसमोर नक्की कसं वागायचं हा प्रश्न पडतोय? Sudha Murthy यांच्या पॅरेंटिंग टिप्स नक्कीच मदत करतील) )

​रिधान

तुम्ही तुमच्या मुलाच नाव रिधान असं ठेवा. रिधान नावाचा अर्थ संधोधन असं आहे. तुम्ही देखील मुलाकरता हे नाव निवडू शकता.

(वाचा - Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?) )

​शार्विल

शार्विल या नावाचा अर्थ आहे भगवान कृष्ण. जर तुम्हाला देखील मुलाला अध्यात्मिक नाव ठेवायचं असेल तर हे नाव नक्की निवडा. या नावाचा ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे.

(वाचा - मुलांना एकच खोली शेअर करायला देणं योग्य आहे का? ५ गोष्टी ज्या पालकांना माहित असायलाच हव्यात))

​शिवम

२०२३ मध्ये शिवम या नावाची जोरदार चर्चा आहे. भगवान शिवशी संबंधीत हे नाव अतिशय लोकप्रिय आहे. शिवम या नावाचा अर्थ आहे शुभ, भगवान शंकर-शिव असा होतो.

(वाचा - 8 वर्षाच्या मुलाला पालकांनी जबरदस्तीने रात्रभर पाहायला लावला टीव्ही, टीव्हीचं वेड म्हणून दिली ही शिक्षा))

​श्रेयांश

जर तुम्ही देखील युनिक नावाच्या शोधात असाल तर श्रेयाशं हे नाव परफेक्ट आहे. या नावाचा अर्थ आहे यश दाता, लकी, अमीर असा होतो. हे नाव अतिशय लोकप्रिय आहे.

(वाचा - तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

वियान

जर तुम्ही मुलाकरता वियान हे नाव निवडू शकता. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुलाचे नाव वियान असं आहे. वियान या नावाचा अर्थ आहे ऊर्जाने भरलेला, अत्यंत उत्साही.

(वाचा - वर्किंग मदरला मुलांसोबतचं नातं घट्ट करायचं असेल तर सद्गुरूंच्या या टिप्स करा फॉलो)

​शिवांश

शिवांश हे नाव अतिशय पवित्र नाव म्हणून ओळखलं जातं. शिवांश हे नाव भगवान शंकर यांच्यावरून निर्माण झालं. या नावाकरता शिवभक्त आवर्जुन निवडू शकतात.

(वाचा - या ६ गोष्टी करा आणि मुलांना स्मार्टफोन आणि टीव्हीपासून दूर ठेवा, प्रत्येक पालकांसाठी उपयुक्त टिप्स) )

लेखकाबद्दल
दक्षता समीर घोसाळकर
"दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 11 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख