अ‍ॅपशहर

कडाक्याच्या थंडीतही मुलांना येतो आहे घाम? ही धोक्याची घंटा असल्याने करू नका दुर्लक्ष!

काही मुलांना मुळातच खूप घाम येतो तर काही मुलांना कधी घाम येतच नाही. या सर्वच माणसांसाठी सामान्य गोष्टी आहेत. पण काही मुलांना कडाक्याच्या थंडीतही घाम येतो. असं का होतं? ही धोक्याची घंटा किंवा काही गंभीर समस्या आहे का? जाणून घ्या यावरील उपाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2021, 3:13 pm
थंडीच्या दिवसांत अनेक लहान मुलांमध्ये एक विचित्र गोष्ट दिसून येते. थंडी म्हटलं की घाम हा तसा येतच नाही, पण काही लहान मुलांना थंडीत सुद्धा घाम येत असल्याचे दिसून येते. असा विपरीत परिणाम दिसल्यावर सहाजिकच पालकही घाबरून जातात आणि त्यांनी त्याबद्दल चिंताही व्यक्त करायलाच हवी कारण ही एक शारीरिक समस्या असून याचे मोठे परिणाम दिसून येऊ शकतात जे मुलाच्या शरीरावर गंभीररित्या परिणाम दाखवू शकतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम why children faces sweat problem even in cold days everyone should to know in marathi
कडाक्याच्या थंडीतही मुलांना येतो आहे घाम? ही धोक्याची घंटा असल्याने करू नका दुर्लक्ष!


याबद्दल आजही जनमानसात जागरुकता नाही. त्यामुळे या लेखातून आम्ही याच समस्येविषयी सर्व इत्यंभूत माहिती देत आहोत जेणेकरून या समस्येबद्दल अनेकांना माहिती मिळेल आणि यावर वेळीच उपचार करता येतील. चला जाणून घेऊया काय आहे ही विचित्र समस्या आणि ही समस्या निर्माण का होते? (Why do children sweat even on cold days?)

का येतो घाम?

अनेक लोकांना हेच वाटते की थंडीच्या दिवसांत घाम येत नाही पण ही गोष्ट 100% खरी नाही. थंडीच्या दिवसांत सुद्धा सर्वांना घाम येतो, मग तुम्ही लहान असा की मोठे, पण हा घाम अत्यंत कमी असतो. त्यामुळे दिसून येत नाही. शिवाय वातावरण थंड असल्याने आणि हवा सुद्धा सुरु असल्याने हा घाम जाणवत नाही. लहान मुलांना या काळात घाम यासाठी येतो कारण ते एकाच कुशीवर कित्येक तास झोपून राहतात. मोठ्या व्यक्ती झोपल्यावर सतत कूस बदलत असतात त्यामुळे त्यांना फार कमी घाम येतो किंवा घाम येत सुद्धा नाही. पण लहान मुलांसोबत असे होत नाही, त्यांना एकाच कुशीवर जास्त काळ झोपण्याची सवय असते आणि त्याचा परिणाम म्हणून घाम येतो. यालाच नाईट स्वेट असेही म्हणतात.

(वाचा :- इम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन?)

खूप कपडे परिधान करणे

मुलांना थंडी लागू नये म्हणून आई सवयीप्रमाणे लहान मुलांना खूप कपडे घालून झोपवते. यामुळे नक्कीच थंडीपासून त्यांचे संरक्षण होते. पण एक वेळ अशी येते की शरीराचे तापमान वाढत जाते आणि लहान मुलांना घाम येऊ लागतो. लहान मुलांना जास्त गरम पदार्थ खाऊ घातल्याने सुद्धा अशा प्रकारचा परिणाम दिसून येऊ शकतो. शरीराला घाम येणे हे शरीराच्या तापमानावर अवलंबून आहे. शरीराचे तापमान वाढले की घामाच्या धरा वाहू लागतात. अनेकदा बाळाला ताप, सर्दी, खोकला असतानाही घाम येत असतो. आला हार्मोनल बदल कारणीभूत असतात.

(वाचा :- मुलांना द्या विविध डाळींपासून बनवलेली घरगुती मल्टिग्रेन पावडर, उंची वाढेल व हाडे होतील मजबूत!)

मुलांना कधी स्वेटर किंवा जास्त कपडे घालावे?

मुलाच्या हालचालीकडे आणि कम्फर्ट कडे लक्ष द्या. जर जास्त थंडी असेल आणि तुम्ही खूप कपडे व सोबत मोजे घातले असतील आणि लहान मुलांना गरम वाटत असेल तर अधिकचे कपडे त्यांच्या अंगावरून काढा. काही मुलांची थंडी सहन करण्याची क्षमता अधिक असते तर याउलट काही मुलांची थंडी सहन करण्याची क्षमता अत्यंत कमी असते. जर तुम्ही एकच कपडा घातल्याने बाळाला थंडी वाजत असेल तर मात्र तुम्ही त्याला अजून एक स्वेटर घातले पाहिजेत कारण अशा मुलांना थंडी लगेच पकडू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या.

(वाचा :- विराटच्या आयुष्यातही झालं परीचं आगमन, तिच्यासाठी आहेत ‘या’ खास भावना व योजना!)

थंडीत मोजे घालणे

अनेकदा लहान मुलांना रात्रीचे मोजे घालून झोपवल्याने सुद्धा घाम येऊ शकतो. रात्रीचे तुम्ही बाळाच्या पायात मोजे घातले की त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते सकाळ पर्यंत तसेच ठेवावेत. एक विशिष्ट वेळेनंतर बाळाच्या पायाचे तापमान वाढेल आणि त्याला पायाजवळ घाम येण्यास सुरुवात होईल. असा घाम येणे हा बाळाला त्रासदायक ठरू शकतो आणि काही शारीरिक व्याधींना आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे बाळाला रात्रीचे मोजे घातले असतील तर काही वेळाने पायाचे तापमान तपासावे जर पायाला घाम आला असेल तर तुम्ही ते मोजे काढू शकता.

(वाचा :- अतिसाराची समस्या बनू शकते मुलांसाठी जीवघेणी, ‘हे' आयुर्वेदिक उपाय करतात धोका कमी!)

गंभीर आजारांची लक्षणे

लहान मुलांना घाम येणे ही सामन्य गोष्ट आहे. पण लहान मुलांना सतत घाम येणे ही गंभीर गोष्ट आहे. जर मुलाच्या हातांचे पंजे, पायाचे तळवे सतत ओले राहत असतील तर ही काही गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात. या सोबतच बाळ कमी खेळणे, एके ठिकाणी बसून राहणे, त्याला थकवा जाणवणे, श्वास घेण्यात समस्या निर्माण होणे यांसारखी लक्षणे सुद्धा दिसत असतील तर मात्र आवर्जून डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण अशावेळी लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे असते.

(वाचा :- मुलांच्या भावनांशी समरस होऊन त्यांच्या रागावर व आक्रस्ताळीपणावर विजय मिळवण्यासाठी बालरोगतज्ज्ञांच्या 'या' टिप्स येतील कामी!)

महत्वाचे लेख