अ‍ॅपशहर

नगरमध्ये एसटी बस उलटली, १० ते १५ जखमी

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आज सकाळी एसटी बस उलटली. अपघातग्रस्त बसमधील १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. पाच प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2018, 11:56 am
अहमदनगर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st-accident


अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आज सकाळी एसटी बस उलटली. अपघातग्रस्त बसमधील १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. पाच प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येते.

कर्जत-नगर रस्त्यावर चिंचोली रमजान गावाजवळ आज सकाळी बसला अपघात झाला. स्टिअरिंग रॉड तुटल्याने बस उलटली. यात १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील पाच प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून, काही किरकोळ जखमी झाले आहेत, असे सांगण्यात येते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज