अ‍ॅपशहर

अकरावी प्रवेशाची धामधूम सुरू

अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ज्युनिअर कॉलेजांमध्ये सोमवारी सुरू झाली असून पहिल्याच दिवशी प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. नगर शहरामध्ये मात्र बहुतांश नामवंत कॉलेजांनी सायन्स व कॉमर्स अभ्यासक्रमांचे अर्ज वेबसाइटवर टाकले आहे.

Maharashtra Times 20 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 th admission process
अकरावी प्रवेशाची धामधूम सुरू


अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ज्युनिअर कॉलेजांमध्ये सोमवारी सुरू झाली असून पहिल्याच दिवशी प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. नगर शहरामध्ये मात्र बहुतांश नामवंत कॉलेजांनी सायन्स व कॉमर्स अभ्यासक्रमांचे अर्ज हे आपल्या वेबसाइटवर टाकले आहेत. त्यामुळे या कॉलेजांमध्ये केवळ आर्टस् शाखेचे अर्ज घेण्यास विद्यार्थी आले होते. दरम्यान, जिल्ह्यामध्ये सर्वत्र प्रवेश प्रक्रिया शांततेत सुरू झाली असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे अकरावीच्या विद्यार्थ्यांना मोफत अर्ज व माहितीपुस्तक उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. परंतु, सायन्स व कॉमर्स या दोन्ही शाखांकडे विद्यार्थ्यांचा असणारा ओढा लक्षात घेऊन शहरातील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, पेमराज सारडा कॉलेज यांनी सायन्स व कॉमर्सचे प्रवेश अर्ज हे कॉलेजचे वेसाइटवर टाकले आहेत. न्यू आर्टस् कॉलेजच्या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना अकरावीच्या अर्जाची प्रिंट काढून त्याला आवश्यक कागदपत्रे जोडून तो कॉलेजमध्ये जमा करावा लागणार आहे. तर, पेमराज सारडा कॉलेज व रेसिडेन्शिअल कॉलेजचे अर्ज हे ऑनलाइन भरावे लागणार आहेत.

राधाबाई काळे महिला महाविद्यालय व अहमदनगर कॉलेजमध्ये मात्र विद्यार्थ्यांना आर्टस्, कॉमर्स व सायन्स या तिन्ही शाखांचे अर्ज कॉलेजमध्येच उपलब्ध करून दिलेत. हे अर्ज भरून विद्यार्थ्यांना कॉलेजांमध्ये जमा करावे लागतील. प्रवेश अर्ज कॉलेजांमध्ये जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना २४ ते २९ जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीवर आक्षेप घेण्यासाठी १ जुलै रोजी मुदत देण्यात आली असून विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी ३ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्र जमा करून अकरावीला प्रवेश घेता येईल.

चौकट ः

आर्टस् साठी थेट प्रवेशाचे नियोजन

आर्टस् शाखेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे कॉलेजांमध्ये आर्टस् शाखेच्या प्रवेश अर्जाचे वाटप केले जात आहे. अनेक कॉलेजांनी तर आर्टस् शाखेला २४ जूनपासून थेट प्रवेश देण्याचे नियोजन केले आहे. तर, कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन करून त्यांना आर्टस् शाखेला प्रवेश घेण्याचे आवाहनही कॉलेज प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

चौकट ः

प्रवेश अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

दहावीच्या गुणपत्रकाची छायांकित प्रत (त्यावर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी आवश्यक)

शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत

जातीचा दाखला (आवश्यकता असल्यास)

कला व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्याचे प्रमाणपत्र (आवश्यकता असल्यास)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज