अ‍ॅपशहर

वृध्द महिलेवर तरुणाचा अत्याचार; तरुण अटकेत

अहमदनगर शहराजवळील मिरावली पहाड येथे ६५ वर्षाच्या पुणे येथील वृध्द महिलेला मोटारसायकलवर लिफ्ट देऊन घेऊन जाणाऱ्या २२ वर्षाय तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. सोमवारी दुपारी दीड वाजता हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना तत्परता दाखवत अवघ्या चार तासात आरोपी राजू दशरथ दुसुंगे (वय २२, वारुळवाडी, नगर) याला अटक केली आहे. त्याच्याकडून महिलेचा चोरलेला मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.

Maharashtra Times 24 Jul 2017, 9:18 pm
म. टा. प्रतिनिधी, अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 years old boy raped an old lady in ahamadnagar district the boy got arrested
वृध्द महिलेवर तरुणाचा अत्याचार; तरुण अटकेत

अहमदनगर शहराजवळील मिरावली पहाड येथे ६५ वर्षाच्या पुणे येथील वृध्द महिलेला मोटारसायकलवर लिफ्ट देऊन घेऊन जाणाऱ्या २२ वर्षाय तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. सोमवारी दुपारी दीड वाजता हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना तत्परता दाखवत अवघ्या चार तासात आरोपी राजू दशरथ दुसुंगे (वय २२, वारुळवाडी, नगर) याला अटक केली आहे. त्याच्याकडून महिलेचा चोरलेला मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.

या आरोपीविरुध्द कॅम्प पोलिस स्टेशनला बलात्कार, चोरी करणे असा गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका गावातील महिला एकटीच मिरावली पहाड येथील मिरावली दर्ग्याच्या दर्शनासाठी नेहमी येते. रविवारी अमावस्या असल्याने ही महिला दर्ग्याच्या ट्रस्टच्या खोलीमध्ये मुक्कामी राहिली. दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी ही महिला घरी जाण्यासाठी पहाड उतरत होती. त्याचवेळी आरोपी राजू दुसुंगे मोटारसायकलवरून पाठीमागून आला. आजी तुम्हाला बुऱ्हाणनगर येथे सोडतो असे म्हणून आरोपीने महिलेला मोटारसायकलवर बसविले. काही वेळाने निर्जण ठिकाणी थांबून महिलेवर अत्याचार करून आरोपी हा निघून गेला. महिलेने कोणाला संपर्क करू नये म्हणून आरोपी मोबाइल घेऊन गेला. ही महिला पुन्हा मिरावली पहाड येथे गेल्यानंतर झालेल्या घटनेबाबत तेथील ट्रस्टीला सांगितले. या महिलेला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या महिलेच्या पाठीमागून राजू नावाचा तरुण गेल्याचे लक्षात येतात ट्रस्टींनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वाघ, भरत डंगोरे, अभय कदम यांचे पथक व कॅम्प पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक

कैलास देशमाने यांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांच्या पथकाने नगर-औरंगाबाद रोडवर एका हॉटेलजवळून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून महिलेचा चोरलेला मोबाइलही हस्तगत करण्यात आला.

आरोपीच्या घरून फोटो आणला

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव व गाव समजल्यानंतर पोलिस राजू दुसुंगे याच्या घरी गेले. घरातून आरोपी राजूचा फोटो त्याच्या भावानेच पोलिसांना दिला. त्यानंतर हा फोटो पिडित महिलेला दाखविल्यानंतर तिने आरोपीला ओळखले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज