अ‍ॅपशहर

विद्यार्थिनीकडे सेक्सची मागणी; प्राध्यापकाविरुध्द गुन्हा

इंटरनल परीक्षेत गुण वाढवून देतो असे असे सांगून बारावीतील विद्यार्थिनीकडे प्राध्यापकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बुधवारी प्राध्यापकाविरुध्द विनयभंग करणे, अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 22 Jan 2020, 6:07 pm
अहमदनगरः इंटरनल परीक्षेत गुण वाढवून देतो असे असे सांगून बारावीतील विद्यार्थिनीकडे प्राध्यापकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बुधवारी प्राध्यापकाविरुध्द विनयभंग करणे, अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्राध्यापक फरार झाला आहे. सुरुवातीला हा प्रकार दाबण्यात आला होता. गाव बंद ठेवून ग्रामस्थ पोलिस स्टेशनला गेले होते. त्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime


या प्रकरणी प्राध्यापक बाबूराव पांडुरंग कर्णे (रा. बोरावकेनगर,श्रीरामपूर) याच्याविरुध्द फिर्याद नोंदविण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या आईच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगळवारी वर्गात असताना प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी असा प्रकार केला होता. घडलेला प्रकार मुलीने आला सांगितला होता. मुलगी व नातेवाइकांनी महाविद्यालयात येऊन प्राचार्यांकडे तक्रार केली होती. परंतु प्राध्यापकाने मुलीची माफी मागितली होती. असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे लेखी ही प्राचार्यांना दिले होते. परंतु हा प्रकार इतर विद्यार्थीनींच्या पालकांना समजला होता. गावात ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ग्रामस्थ महाविद्यालयात जमले होते. बुधवारी सकाळी ग्रामस्थ हे श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला गेले होते. प्राध्यापकाविरुध्द गुन्हा नोंदविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून प्राध्यापकाविरुध्द बुधवारी दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्राध्यापक हा गावातून फरार झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज