अ‍ॅपशहर

गोंधळी शिक्षकांवर होणार कारवाई

जिल्हा शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणारे शिक्षक जिल्हा परिषदेच्या रडारवर आले आहेत. या शिक्षकांवर पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती पोलिसांकडून घेतली जाणार आहे.

Maharashtra Times 26 Sep 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम action against teacher for rada
गोंधळी शिक्षकांवर होणार कारवाई


जिल्हा शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणारे शिक्षक जिल्हा परिषदेच्या रडारवर आले आहेत. या शिक्षकांवर पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती पोलिसांकडून घेतली जाणार आहे. त्यानंतर शिक्षकांच्या कृतीमुळे सरकारी सेवेतील कोणत्या नियमांचा भंग होत आहे, याची सविस्तर चौकशी करून संबंधित शिक्षकांवर खात्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ विश्वजीत माने यांनी दिले आहेत.

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची रविवारी शहरातील नंदनवन लॉन्स येथे वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत मात्र काही शिक्षकांनी गोंधळ घातला. एकमेकांना शिवीगाळ, धक्काबुक्कीही केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत काही जणांना ताब्यात घेऊन थेट पोलिस स्टेशनमध्ये आणले. येथे चार ते पाच तास बसवल्यानंतर समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले. जिल्हा परिषदेने मात्र या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. शिक्षकांच्या या प्रकाराची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाईचे आदेश सीईओ माने यांनी दिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज