अ‍ॅपशहर

इंदोरीकर महाराज माफी मागा; तृप्ती देसाईंनी धाडली नोटीस

लिंगभेदाबाबत केलेल्या एका विधानाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आता इंदोरीकर महाराजांना वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. दरम्यान, याआधी देसाई यांनी इंदोरीकरांविरुद्ध पोलिसांत तक्रारही दिलेली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Feb 2020, 5:16 pm
अहमदनगर: लिंगभेदाबाबत केलेल्या एका विधानाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आता इंदोरीकर महाराजांना वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. दरम्यान, याआधी देसाई यांनी इंदोरीकरांविरुद्ध पोलिसांत तक्रारही दिलेली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम desai-indurikar


तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांना वकील मिलिंद पवार यांच्यामार्फत नोटीस पाठवली आहे. या नोटिशीवर १० दिवसांत उत्तर न दिल्यास थेट न्यायालयात धाव घेऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. इंदोरीकरांनी तमाम महिलांची माफी मागायला हवी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. इंदोरीकर महाराजांच्या संगमनेरमधील ओझर बुद्रूक येथील पत्त्यावर ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

...म्हणून इंदोरीकर महाराजांना धारेवर धरू नये: पद्मश्री पोपटराव पवार

इंदोरीकरांच्या कीर्तनातून सातत्याने महिलांचा अपमान केला जातो. यापुढे महिलांचा अपमान होईल, अशी वक्तव्ये मी करणार नाही, असे कुठेही इंदोरीकर महाराजांनी अद्याप जाहीरपणे सांगितलेले नाही. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध महिलांचा अपमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. ही मागणी आम्ही लावून धरली तेव्हा त्यांच्या समर्थकांकडून अनेक ठिकाणी आमचं चारित्र्यहनन करणारी भाषा वापरण्यात आली. आम्हाला अश्लील शिविगाळ करण्यात आली. कापून टाकण्याची भाषाही केली गेली. म्हणूनच समस्त महिला वर्गाची त्यांनी माफी मागायला हवी. यापुढे अशी कोणतीही वक्तव्ये करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट करायला हवे, असे देसाई यांनी सांगितले.

'तुला कापून टाकीन' म्हणणाऱ्या 'या' महाराजांचा माफीनामा

काय आहे वाद?

'सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान इंदोरीकर महाराजांनी केले होते. या विधानावर आक्षेप घेत इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी नगरच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन केली होती. देसाई नगरला आल्या असता त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ नगरमधील अकोले तालुक्यात बंदही पाळण्यात आला होता. इंदोरीकर यांच्या अनेक समर्थकांनी तृप्ती देसाई यांच्यावर आगपाखड करत माफीची मागणी केली होती.

आणखी वाचा:
इंदोरीकरांचा 'तो' व्हिडिओच यू-ट्यूबवर सापडेना! कारवाई कशी होणार?
इंदोरीकरांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज