संगमनेर : महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव व नगर जिल्हा दारूबंदी आंदोलनाच्या अध्यक्षा अॅड. रंजना पगार-गवांदे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्य व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण ३ फेब्रुवारीला चंद्रपूर येथे राज्यपाल यांच्या हस्ते होणार आहे. गवांदे यांनी गेल्या काही वर्षांपासून ३१ डिसेंबरला, 'द दारूचा नव्हे, द फक्त दुधाचा' हा प्रयोगशील उपक्रम राबविला आहे. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जिल्हाभर दारूबंदीचा कार्यक्रम राबविण्यात पुढाकार घेतला. जिल्ह्यात तेराशेहून अधिक गावांत जाऊन त्यांनी प्रबोधन केले. ८१० गावांत दारूबंदीचे ठराव मंजूर करून घेतले. साडेतीन लाख लोकांच्या दारूबंदीविरोधी मोहिमेसाठी सह्या घेतल्या. दारूबंदी व व्यसनमुक्ती क्षेत्रात सुमारे २४ वर्षे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याची दखल घेऊन सरकारने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
अॅड. गवांदे यांना पुरस्कार
महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव व नगर जिल्हा दारूबंदी आंदोलनाच्या अध्यक्षा अॅड...
30 2 Feb 2019, 4:00 am