अ‍ॅपशहर

स्मशानभूमीसाठी जिवंत माणसाची प्रेतयात्रा

स्मशानभूमीसह अन्य प्रश्न मार्गी लागत नसल्याच्या निषेधार्थ शेवगावमध्ये तरुणाने स्वत:चीच अंत्ययात्रा काढून अनोखे आंदोलन केले. स्मशानभूमी येथे पोहोचल्यावर या तरुणाने सुरू केलेल्या आंदोलनाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2022, 5:57 am
अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम feneral
स्मशानभूमीसाठी जिवंत माणसाची प्रेतयात्रा

स्मशानभूमीसह अन्य प्रश्न मार्गी लागत नसल्याच्या निषेधार्थ शेवगावमध्ये तरुणाने स्वत:चीच अंत्ययात्रा काढून अनोखे आंदोलन केले. स्मशानभूमी येथे पोहोचल्यावर या तरुणाने सुरू केलेल्या आंदोलनाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

शेवगाव (जि.अहमदनगर) येथील स्मशानभूमीमध्ये पाणी, लाईट अशा विविध सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सातत्याने मागणी करून देखील स्मशानभूमीमध्ये शेवगाव नगरपरिषदेने सुविधा केल्या नाहीत. अखेर स्मशानभूमीमध्ये मूलभूत सुविधांची मागणी करीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव संजय नांगरे यांनी स्वतःची प्रेतयात्रा काढत केले अनोखे आंदोलन. स्मशानभूमीच्या मागणीसाठी प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात आल्यानं या आंदोलनाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज