अ‍ॅपशहर

Radhakrishna Vikhe-Patil: विखे-पाटलांचं २० वर्षांचं वर्चस्व मोडीत

Ahmednagar Gram Panchayat Poll Results: अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकाल समोर येत असून भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे-पाटील व राम शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2021, 4:35 pm
अहमदनगर: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून अनेक धक्कादायक निकाल पुढं येत आहेत. नगरमध्ये भाजपचे नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लोणी खुर्द गावात विखेंच्या पॅनलचा दणदणीत पराभव झाला आहे. (Ahmednagar Gram Panchayat Poll Results)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Radhkrishna Vikhe-Patil


वाचा: ज्या हातांनी गाव उभे केले, तेच हात...; पोपटराव पवार भावुक

लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी १७ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. विखे यांच्या पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे. विखे यांच्या लोणी बुद्रुक गावातील निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. मात्र, शेजारच्या लोणी खुर्द गावातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या गावात मागील २० वर्षांपासून विखेंची सत्ता होती. यावेळी विखेंना सत्ता गमवावी लागली आहे.

Live: ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरुवात, 'असं' आहे चित्र

जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलनं विखेंना धक्का दिला आहे. राहता तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात मात्र विखेंना आधीच यश आलं आहे.

राम शिंदे यांनाही धक्का

नगरमधील भाजपचे दुसरे नेते व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना पराभवाची धूळ चारणारे आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्या चौंडी गावची सत्ता भाजपकडून खेचून आणली आहे.

वाचा: कल्याणसारखे रस्ते कुठेच नाहीत; शिवसेनेच्या कारभारावर आव्हाड बरसले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज