अ‍ॅपशहर

नगर जिल्हा रुग्णालय आग: सरकारच्या कारवाईनंतर उभा राहिला वेगळाच पेच

Ahmednagar Civil Hospital Fire: नगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत लागलेल्या आगीप्रकरणी तीन परिचारिकांना निलंबित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2021, 12:24 pm
अहमदनगर: जिल्हा रुग्णालयात कोविड अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीप्रकरणी (Ahmednagar Civil Hospital Fire) सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यातील कर्मचाऱ्यांवरील कारवाईला संघटनेने विरोध केला असून ती मागे घेण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ahmednagar
अहमदनगर


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह चार जणांना निलंबित तर दोघांची सेवा समाप्त करण्याचा आदेश दिला. या कारवाईमध्ये तीन परिचरिकांचा समावेश असल्याने सरकारने केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत आज मंगळवारी सकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी या निर्णयाविरोधात निदर्शने केली. पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिदक्षता विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाची सुरक्षा, तांत्रिक यंत्रणा याची जबाबदारी वरिष्ठांची असते. तसेच संबधित विभागांची असते. अचानक आग लागल्यानंतर त्याला जबाबदार धरून परिचरिकांना निलंबित करणे, सेवा समाप्ती करणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. त्यामुळे ही कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी अन्यथा राज्यभरातील परिचारिका संवर्गातील कर्मचारी आवाज उठवतील. यापुढे अतिदक्षता विभागामध्ये काम करण्यास नकार दिला जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

वाचा: पुण्यात थरार! गोदामाची आग आटोक्यात येत असतानाच महावितरणच्या डीपीनं पेट घेतला आणि...

या निषेध सभेनंतर सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही कार्यरत असणार आहोत. मात्र, अन्यायकारक पद्धतीने झालेल्या निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. करोनाच्या काळामध्ये शासकीय परिचारिकांनी अहोरात्र काम केले. अनेक रुग्णांचा जीव वाचवला आहे. नातेवाईकांना सोबत थांबण्यास मज्जाव असताना आपल्या जीवावर उदार होऊन परिचारिकांनी काम केलेले आहे. या कामाचे कौतुकही करण्यात येत असताना आता इतरांच्या चुकीची शिक्षा परिचरिकांना देणे चुकीचे आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

वाचा: एसटी संपाविरोधात राज्य सरकार आक्रमक; 'हा' निर्णय घेतला जाण्याची शक्यता
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज