अ‍ॅपशहर

नगर: करोना बाधित महिलेनं दिला जुळ्याना जन्म

अहमदनगरमध्ये एका करोनाबाधित महिलेनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. आईसह दोन्ही बाळांची प्रकृती उत्तम आहे. (Corona positive woman gives birth to twins)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2020, 2:21 pm
अहमदनगर: नगरमध्ये आढळलेल्या एका करोना बाधित महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. येथील जिल्हा रुग्णालयात या महिलेचे सिझरियन करण्यात आले. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांची आणि मातेची प्रकृती व्यवस्थित असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. (Corona positive woman gives birth to twins)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Baby


१४ दिवस शेतात क्वारंटाइन राहूनही गावकऱ्यांची कुटुंबाला मारहाण

मुंबई येथून एक गर्भवती महिला निंबळक (ता. नगर) येथे आली होती. या महिलेची २५ मे ला करोना अनुषंगाने तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तिचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. आज या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला.

दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे. दरम्यान, या दोन्ही मुलांची सुद्धा करोना अनुषंगाने तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी ही माहिती दिली.

Live: देशभरात २२ ग्रीन एक्स्प्रेस वे उभारणार - गडकरी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज