अ‍ॅपशहर

कल्याणसाठी शिवशाही बससेवा सुरू

एसटी महामंडळाने शिवशाही बसला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. नगर विभागाने कल्याणसाठी पाच फेऱ्या मंजूर केल्या असून मंगळवारी सकाळी एसटीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिली बस मार्गस्थ करण्यात आली.

Maharashtra Times 7 Mar 2018, 3:13 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ahmednagar kalyan shivshahi bus service starts
कल्याणसाठी शिवशाही बससेवा सुरू


एसटी महामंडळाने शिवशाही बसला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. नगर विभागाने कल्याणसाठी पाच फेऱ्या मंजूर केल्या असून मंगळवारी सकाळी एसटीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिली बस मार्गस्थ करण्यात आली. यावेळी विभाग नियंत्रक नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, तारकपूर आगारप्रमुख अविनाश कल्हापूरे, वाहतूक अधीक्षक महाजन उपस्थित होते.

जिल्ह्यात या आधी दहा शिवशाही बस सुरू आहेत. जिल्हांतर्गत तसेच बाहेरच्या जिल्ह्यात फेऱ्या होतात. त्यानंतर आता कल्याणसाठी नव्याने पाच बस सुरू केल्या आहेत. तारकपूर बसस्थानकातून कल्याणसाठी रोज साध्या बसच्या १८ फेऱ्या होतात. यातील पाच फेऱ्या कमी करुन त्याजागी शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे. या बसच्या रोज पाच फेऱ्या होणार आहेत. पहिली बस सकाळी ७.३० वाजता सुटणार आहे. त्यानंतर पुढील बस एक तासाच्या अंतराने ८.३० वाजता सुटेल. त्यानंतर ९.३०, १०.३० व ११.३० असे वेळापत्रक आगाराने निश्चित केले आहे. नगरप्रमाणेच कल्याणवरुनही पाच फेऱ्या मंजूर केल्याची माहिती विभागीय कार्यालयातून देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज