अ‍ॅपशहर

‘त्या’ व्हायरल फोटोवरून डॉ. सुजय विखे ट्रोल

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार प्रचाराची एकही संधी सोडत नाहीत, तर त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेली मंडळी त्यांच्या चुका शोधून सोशल मीडियाद्वारे त्यांना ट्रोल करण्याची संधी दवडत नाहीत. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनाही ट्रोलचा सामना करावा लागला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2019, 1:21 pm
अहमदनगर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sujay-vikhe


अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार प्रचाराची एकही संधी सोडत नाहीत, तर त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेली मंडळी त्यांच्या चुका शोधून सोशल मीडियाद्वारे त्यांना ट्रोल करण्याची संधी दवडत नाहीत. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनाही ट्रोलचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना विखेंनी पोझ दिल्याचा फोटो व्हायरल झाला. यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.

राहुरीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे त्यांच्या निवासस्थानी गेले. गाडे यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करतानाचा विखे यांचा फोटो व्हायरल झाला. विखे यांनी फोटोसाठी पोझ दिली असून, त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचा आरोप करत त्यांना सोशल मीडियात ट्रोल करण्यात येत आहे. ‘डॉ. विखे खरेच मेंदूचे डॉक्टर आहेत का?’ असा उपरोधिक प्रश्नही विचारला जात आहे.

गाडे हे राष्ट्रवादीचे नेते होते. त्यांच्या निधनाच्या दिवशीच काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे उमेदवारी अर्ज दाखल करणे, शक्तिप्रर्दशन आणि प्रचारसभा असे कार्यक्रम सुरू होते. गाडे हे जगताप यांच्या प्रचारात सक्रीय होते. गाडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विखे त्यांच्या निवासस्थानी गेले; पण फोटोमुळे त्यांनाच ट्रोल व्हावं लागलं. गाडे यांचे निधन झाल्यानंतरही जगताप यांनी शक्तिप्रदर्शन आणि प्रचार सभा का सुरू ठेवली? असा प्रश्न उपस्थित करून जगताप यांच्यावरही टीका करण्यास सुरुवात झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज