अ‍ॅपशहर

आठ दिवसांपूर्वी शेततळं बांधलं, पोरं खेळायला म्हणून गेली अन् नको ते होऊन बसलं...

रंगपंचमीच्या दिवशी सुटी असल्याने खेळण्यासाठी म्हणून दोघे लहान भाऊ शेत तळ्यावर गेले. हे शेततळं आठ दिवसांपूर्वीच बांधण्यात आलं होतं. उत्सुकतेपोटी दोन्ही मुलं शेतळ्यावर गेले अन् तिथेच घात झाला. दोघांचाही तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2023, 4:56 pm
अहमदनगर : आज सर्वत्र रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी केली असताना श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे घरासमोरील शेततळ्यात बुडून दोघा लहान भावांचा मृत्यू झाला. आई-वडील घरी नसताना रविवारी दुपारी हे दोन चिमुकले शेततळ्याजवळ खेळत असताना पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ahmednagar Shrigonda Loni vyanknath Brothers died by drowning in the lake
दोन भावांचा मृत्यू


आर्यन बंडोपंत साळुंखे (वय ९) व अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय ८) अशी त्यांची नावे आहेत. लोणीव्यंकनाथ ते येळपणे रस्त्यावर बंडोपंत साळुंखे राहतात. रविवारी दुपारी ते पत्नीसह दुसऱ्याच्या शेतात कामाला गेले होते. त्यावेळी त्यांची मुले घरीच खेळत होती.

साळुंखे यांनी घरासमोरच शेतीच्या पाण्याची सोय म्हणून शेततळे केले आहे. आर्यन व अनिकेत हे दोघे भाऊ रविवारची सुट्टी असल्याने घरीच होते. आठ दिवसांपूर्वीच्या त्यांच्या घरासमोर शेततळे करण्यात आले आहे. उत्सुकतेपोटी ते तेथे खेळायला गेले आणि तळ्यात पडले.

काही वेळात परिसरातीस लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे परिसरातील युवकांनी तळ्यात उतरून त्या दोघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती त्यांच्या आई-वडिलांना देण्यात आली. ते धावतच शेतातून घरी आले. आपल्या चिमुकल्यांचे मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख