अ‍ॅपशहर

महिला वकिलाचा विनयभंग, झेडपी अभियंत्याला न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा

महिला वकिलाचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अभियंत्याला न्यायालयानं तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Edited byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2021, 12:32 pm
विजयसिंह होलम । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Court
झेडपी अभियंत्याला कोर्टाचा दणका


कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण हाताळणार्‍या महिला वकिलाचा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षल महादेव काकडे याला तीन वर्षे कैद व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली. काकडे याच्या पत्नीने कौटुंबिक हिसांचाराची तक्रार दिली होती. त्यांच्या वतीने या महिला वकील काम पहात होत्या. त्या रागातून आरोपीने हे कृत्य केले होते. मात्र, निकाल लागायला तब्बल ११ वर्षे लागली.

वाचा: पुणे पुन्हा हादरले! वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार

शहरातील एका प्रतिष्ठित महिला वकिलाकडे जिल्हा परिषदेचा अभियंता असलेल्या हर्षल महादेव काकडे (रा. केडगाव, शाहूनगर) याच्या विरोधात कौटुंबिक हिसाचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. काकडे याच्या पत्नीतर्फे या महिला वकील काम पाहत होत्या. १० जून २०१० रोजी न्यायालयात सुनावणीचे काम झाल्यानंतर महिला वकील जिल्हा न्यायालयाच्या बाहेर पडल्या. त्यावेळी कोर्टाचे कामकाज शहरातील जुन्या इमारतीत चालत होते. प्रवेशद्वारासमोर आरोपीने त्यांना गाठले. आपल्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला चालवल्याचा राग येऊन त्यांना शिवीगाळ तसेच विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन बदनामी थांबविण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणीही मागितली होती. या प्रकरणी महिला वकिलाने कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी हर्षल काकडे याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोविरुद्ध विनयभंग तसेच खंडणीचाही गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले.

वाचा: मुलगी आत्महत्येचा प्रयत्न करायची म्हणून मांत्रिकाकडे घेऊन गेले आणि…

जिल्हा न्यायालयात सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांच्या समोर यावर सुनावणी झाली. यामध्ये सहा जणांची साक्ष नोंदविण्यात आली. फिर्यादी व साक्षीदाराचा पुरावा ग्राह्य धरुन आरोपी काकडे याला विनयभंगप्रकरणी तीन वर्षे कैद, पाच हजार रुपये दंड, ठार मारण्याची धमकी दिल्याल्याप्रकरणी एक वर्षे कैद पाच हजार रुपये दंड, खंडणी मागितल्याप्रकरणी एक वर्ष कैद व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली. या खटल्यात फिर्यादीच्या वतीने अतिरिक्त सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. केदार केसकर यांनी काम पाहिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज