अ‍ॅपशहर

भाजपविरोधात महाआघाडी

आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष अशी सर्वपक्षीय महाआघाडी स्थापन करून बाजार समिती निवडणूक लढविण्याचा संकल्प सोडला.

Maharashtra Times 29 Sep 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम all political partys mega alliance
भाजपविरोधात महाआघाडी


आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष अशी सर्वपक्षीय महाआघाडीची स्थापना करून बाजार समितीसह यापुढील काळात येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याचा संकल्प नेतेमंडळींनी सोडला. कर्जाच्या खाईत अडकेलेल्या बाजार समितीचा गैरकारभार ५ ऑक्टोबरला होणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चव्हाट्यावर आणण्याची घोषणाही करण्यात आली.

बाजार समिती निवडणूक प्रकिया सुरू झाली असून राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी माजी खासदार दादा पाटील शेळके, शिवसेनेचे जिल्हापुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव बेरड, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसनराव लोटके, राजीव गांधी पतसंस्थेचे संस्थापक उद्धवराव दुसुंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, श्रीनाथ पतसंस्थेतेचे पोपटराव शेवाळे, बाबासाहेब गुंजाळ, ज्ञानदेव दळवी, सुधीर पोटे, संजय गिरवले आदी उपस्थित होते.

या वेळी दादापाटील शेळके म्हणाले, नगर बाजार समितीवर आमची सत्ता असताना राज्यातील पहिल्या पाचमध्ये तिची गणना केली जात होती. बाजार समितीचे उत्पन्न तीन लाखांवरून पाच कोटींपर्यंत नेले होते. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जात होती.

प्रा. गाडे म्हणाले, आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेली बाजार समितीचे विलिनीकरणाबाबतची चर्चा सुरू झाल्याने मनाला खूप वेदना झाल्या. तालुक्याचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी बाजार समितीला गतवैभव मिळवून देण्यासाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे. विरोधकांना तोडीस तोड उत्तर देत सक्षम उमेदवार देऊन साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करत पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवली जाणार आहे. मागील निवडणुकीत अनेक जणांनी विरोधात काम करूनही ४३ टक्के मते मिळाली होती. या वेळी सर्वजण एकत्र आल्याने मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकण्याचा दावा

प्रा. गाडे यांनी व्यक्त केला.

केशव बेरड म्हणाले, आमदार कर्डिले यांच्याकडे सत्ता राहिल्यास तालुका दूध संघाप्रमाणेच बाजार समितीचेही वाटोळे होत आहे. या वेळी प्रताप पाटील शेळके, शंकर साठे, अमोल जाधव, परसराम भगत, बाळासाहेब चेमटे, रामदास भोर, पोपट निमसे, दत्ता पाटील नारळे, संतोष कापसे, सूर्यभान पोटे, सुधीर भद्रे, प्रवीण कोकाटे, जलील शेख आदी उपस्थित होते.

कोट ः

आगामी काळातील बाजार समिती, खरेदी विक्री संघ, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका महाआघाडी एकत्रित लढणार.

- संपतराव म्हस्के

कोट ः

नगर-श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्याविरोधात काम करू.

- किसनराव लोटके

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज