अ‍ॅपशहर

आंबेडकर जयंतीनिमित्तआज मिरवणूक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शहरातून शुक्रवारी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीसाठी शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Maharashtra Times 14 Apr 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambedkar jayanti
आंबेडकर जयंतीनिमित्तआज मिरवणूक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शहरातून शुक्रवारी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीसाठी शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्यावेळी मिरवणूक डिजेमुक्त झाली होती. यंदा डिजेमुक्त मिरवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्केट यार्डसमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले जाणार आहे. महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी व इतर सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी चारनंतर शहरातून जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत दहा मंडळे सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी या मंडळाने डिजेमुक्त मिरवणूक काढली होती. यंदा डिजेमुक्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवाडा, आशा टॉकीज, माणिक चौक, कापडबाजार, चितळेरोड, दिल्लीगेट या मार्गावर मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक शांततेत होण्यासाठी पोलिस प्रशासनाने अनेक जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. तर चार संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्त असलेल्या तेरा जणांना एक दिवसासाठी शहराबाहेर रहावे लागणार आहे. तर ५५ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वाखाली
अकरा अधिकारी व साडेतीनशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. जयंतीनिमित्त अहमदनगर इंटरनॅशनल सेंटरचे लोकापर्ण होत आहे. केडगाव येथे हे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात तळमजल्यावर असणाऱ्या बाराशे चौरस फुटांच्या डॉ. आंबेडकर सभागृहाचे ही उद्या लोकार्पण होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज